Weak Bones: हाडं कमकुवत होण्याची आहेत 'ही' 7 लक्षणं, वेळीच घ्या काळजी

हाडं कमकुवत होण्याची ही सात लक्षण असु शकतात.
Weak Bones
Weak BonesDainik Gomantak
Published on
Updated on

Weak Bones: निरोगी आणि मजबूत हाडांसाठी लाइफस्टाइलमध्ये बदल करणे गरजेचे आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे हाडांची झीज होऊ लागते. ज्यामुळे फ्रॅक्चर आणि गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. हाडांची कमकुवतपणा किंवा ऑस्टिओपोरोसिस ही एक सामान्य स्थिती आहे. तज्ञांच्या मते तुमच्या शरीरात ही लक्षणं दिसल्यास हाडं कमकुवत होऊ शकतात. यामुळे हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • फ्रॅक्चर होणे

वारंवार फ्रॅक्चर किंवा दुखापत होत असेल तर हाडं कमकुवत झाले आहेत असे समजावे. अनेकवेळा किरकोळ जखम किंवा पडल्यामुळे सहज फ्रॅक्चर होऊ शकते. असे वारंवार होत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावे.

  • पाठदुखी

अनेक लोकांना पाठदुखीची समस्या असते. हे देखील कमकुवत हाडांचे लक्षण असु शकते. पाठीचा कणा कमकुवत झाल्यावर स्पायनल फ्रॅक्चर होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही काम करणे अवघड होते. यामुळे डॉक्टरांशी वेळीच संपर्क साधून उपचार सुरू करावा.

  • हातांची पकड कमकुवत होणे

हातांची पकड कमकुवत होणे हे मनगटांचे हाडे कमकुवत होण्याते लक्षण आहे. वाढते वय आणि स्नायू कमकुवत होणे हे देखील हाडं कमकुवत होण्याचे कारण असू शकते. यामुळे हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे गरजेचे असते. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

Weak Bones
Happy Life: निरोगी मानसिक आरोग्यासाठी 'या' 4 गोष्टींपासून राहा दूर
  • नख

नखांवरून देखील हाडांच्या आरोग्यासंदर्भात माहिती मिळते. कॅल्शिअम किंवा व्हिटॅमिन डी या कमतरतेमुळे नख ठिसुळ होतात. यामुळे नखांवरून देखील हाडे कमकुवत आहे हे लक्षात येते. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • कमी उंची

वयानुसार उंची कमी होणे हे देखील कमकुवत हाडांचे लक्षण असू शकते. जसजशी हाडांची घनता कमी होत जाते, तसतसे मणक्यातील हाडं संकुचित होऊ लागतात. यामुळे तुमची उंची कमी होऊ शकते. जर तुमची उंची कमी होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि हाडांची तपासणी करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com