Feeling Hungry Every Time: वारंवार भूक लागणे असू शकतात 'या' आजारांचे लक्षण

वारंवार भूक लागणे हे अनेक रोगांचे लक्षण आहे. जेवण करूनही काही खाण्याची इच्छा होत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा
 Hunger
HungerDainik Gomantak
Published on
Updated on

Feeling Hungry Every Time: तुम्हालाही जेवण केल्यानंतर पुन्हा भूक लागते. पोट भरल्यानंतरही काही खावेसे वाटते का, तर काळजी घ्यावी. कारण ते सामान्य नसून अनेक रोगांचे लक्षण आहे. 

वारंवार भूक आणि खाल्ल्याने वजन वाढू शकते. इतरही अनेक समस्या याला कारणीभूत ठरू शकतात.जेवण केल्यानंतर भूक लागण्याचे कारण काय असू शकते ते जाणून घेऊया.

  • अपुरी झोप

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोप न लागल्यामुळेही वारंवार भूक लागते. प्रत्येकाने किमान 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. हे मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती योग्य ठेवण्यास मदत करते. 

चांगली झोप घेतल्याने पचनक्रियाही सुधारते. जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा भूकेचे संकेत देणारे हार्मोन वाढते. त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागते. त्यामुळे चांगली झोप आणि पुरेशी झोप घ्या.

  •  मधुमेह

जास्त भूक लागणे हे देखील मधुमेहाचे कारण असू शकते. मधुमेहाच्या रुग्णाच्या पेशींपर्यंत ग्लुकोज पोहोचत नाही, त्यामुळे ऊर्जा बनण्याऐवजी ते लघवीद्वारे बाहेर जाते. कधी कधी साखरेची पातळी जास्त असली तरी भूक लागते. शुगर एकदा तपासली पाहिजे.

  •  थायरॉईड

थायरॉईडच्या रुग्णांनाही वारंवार भूक लागते. जेव्हा थायरॉईड संप्रेरकांची पातळी वाढते. तेव्हा हायपरथायरॉईडीझम होतो. हा ग्रेव्हस रोग आहे. व्यक्तीला पोट रिकामे असल्याचे जाणवते आणि काहीतरी खावेसे वाटते.

Unhealthy Eating
Unhealthy EatingDainik Gomantak
  • प्रथिने

जर तुम्ही तुमच्या आहारात पुरेसे प्रथिने घेत नसाल तर तुम्हाला पुन्हा भूक लागण्याची शक्यता आहे. कारण प्रथिनांच्या साहाय्याने फक्त तेच हार्मोन तयार होते. जे भूक भागवण्याचे संकेत देते. 

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने असल्यास तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. जेवण केल्यानंतरही भूक लागत असेल तर प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

  •  स्ट्रेस

जास्त ताण हे देखील भूक लागण्याचे कारण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढतो. त्याचा थेट परिणाम भूकेवर होतो. डिप्रेशन, अॅन्झायटी डिसऑर्डरमध्येही भुकेची समस्या अधिक असते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com