Fashion Tips: सिल्कच्या साड्यांची अशी घ्या काळजी

सिल्कच्या साड्यांची चमक अधिक काळ टिकून ठेवायची असेलया टिप्स नक्की फॉलो करा.
Fashion Tips: Take care of silk sarees like this
Fashion Tips: Take care of silk sarees like thisDainik Gomantak
Published on
Updated on

साडी (saree) हा असा प्रकार आहे, ज्याला आपण हवे तसे परिधान करू शकतो. साड्यामध्ये रेशीम,कॉटन, जॉर्जर,शिफॉन असे अनेक प्रकार असतात. यात रेशीम साड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. अन्यथा या साड्या लवकर खराब होतात. तुम्हाला जर सिल्कच्या साड्यांची चमक अधिक काळ टिकून ठेवायची असेल तर या टिप्स (Tips) नक्की फॉलो करा.

* सिल्क साडी धुतांना घ्या ही काळजी

अनेक महिला महागड्या साड्या ड्राय क्लीनिंगसाठी देतात. परंतु कधीकधी वेळेच्या कमतरतेमुळे तअसे करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जर तुम्ही सिल्कची साडी धुत असाल तर सर्फ पावडर न वापरता शॅम्पू वापरू शकता. यामुळे साडीवरील डाग कमी होतात आणि साडीची चमक देखील वाढते. यासाठी अर्ध्या बादली पाण्यात एक चमचा मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून 30 मिनिटे पाण्यात भिजवा. नंतर स्वच्छ पाण्यात धुवावे.

* ड्रायरचा वापर टाळावा

सिल्कच्या साड्याना ड्रायरने वाळवू नये. कारण या साड्याची चमक कमी होऊ शकते. या साड्या ब्रशने घासू नये. यामुळे सिल्कची साडी खराब होऊ शकते.

Fashion Tips: Take care of silk sarees like this
काय आहे Hot Towel Scrub? जाणून घ्या फायदे

* नेहमी साडी कव्हरमध्ये ठेवावी

नेहमी सिल्कची साडी हॅंगारमध्ये ठेवू नका. सिल्कच्या साडीची चमक टिकून ठेवण्यासाठी नेहमी साडी कव्हरमध्ये ठेवावी. आजकाल मार्कटमध्ये साड्या ठेवण्यासाठी विशेष कव्हर मिळते.

* साडीचा दुर्गंध दूर करण्यासाठी

अनेक वेळा साड्या न धुतल्याने त्यांना दुर्गंधी येते. हा दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही उन्हात ठेवू शकता. रेशमी साड्या लकडी किंवा लोखंडी हँगर्समध्ये ठेवू नये. तुम्ही फायबर किंवा प्लॅस्टिकचे हँगर्स वापरू शकता. यामुळे सिल्कच्या साड्या चांगल्या राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com