Hot Towel Scrub
Hot Towel ScrubDainik Gomantak

काय आहे Hot Towel Scrub? जाणून घ्या फायदे

हॉट टॉवेल स्क्रबमुळे (Hot Towel Scrub) त्वचेवरील डेड स्कीन, ब्लॅकहेड्स यासारख्या समस्या कमी होतात.
Published on

आजचे जग हे धावपळीचे झाले आहे. आपल्या खाण्या-पिण्याच्या वेळा निश्चित नसल्याने याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. डेड स्कीन (Dead Skin) , ब्लॅक हेड्स (Blackheads) यासारख्या समस्या निर्माण होतात. अनेक महिला पार्लरमध्ये वेगवेगळे फेशियल (Facials) आणि स्क्रबमध्ये पैसे खर्च करतात. पण काही दिवसानंतर त्वचा कोरडी दिसू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हॉट टॉवेल स्क्रबचा (Hot Towel Scrub) वापर करू शकता. यामुळे डेड स्कीन, ब्लॅकहेड्स यासारख्या समस्यापासून सुटका मिळते. तसेच थकवा आणि ताण (Stress) कमी होतो. हे स्क्रब ( Scrub) तुम्ही घरीच करू शकता. जाणून घेवूया याबद्दलअधिक माहिती

Hot Towel Scrub
Monsoon Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी फॉलो करा 'या' टिप्स

* काय आहे हॉट टॉवेल स्क्रब

हॉट टॉवेल स्क्रबमुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन आणि ब्लॅक हेड्स कमी होण्यास मदत करतात. यासाठी टॉवेल कोमट पाण्यात भिजवावे लागेल. नंतर टॉवेल पिळून घेतल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. यामुळे चेहऱ्यावर स्क्रब होऊन चेहऱ्यांवरील डेड स्कीन आणि ब्लॅक हेड्स कमी होण्यास मदत मिळते.

टीप: नरम टॉवेलचा वापर करावा आणि पाणी जास्त गरम वापरुन नये.

* हॉट टॉवेल स्क्रबचे फायदे

  • हॉट टॉवेल स्क्रबमुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो.

  • या स्क्रबमुळे आपल्या शरीराचे रक्ताभिसरण चांगले होते. आठवड्यातून दोन वेळा केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते.

  • हॉट टॉवेल स्क्रब केल्याने शरीरातील घाण स्वच्छ होते. हे स्क्रब संपूर्ण शरीर डिटॅाक्स करण्याचे महत्वाचे काम करते. यामुळे चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी होतात.

  • हॉट टॉवेल स्क्रब नियमित केल्याने त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत मिळते. यामुळे त्वचेवर नवीन पेशी तयार होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com