Eye Care Tips: दृष्टी कमी होण्याची भीती आहे? आजपासूनच फॉलो करा 'या' 6 टिप्स

डोळ्यांची काळजी घेणे खुप गरजेचे आहे.
Eye Care Tips
Eye Care TipsDainik Gomantak

Eye Care Tips for Low Vision: डोळे आपल्या शरिराचा सर्वात नाजुक भाग आहे. त्याची काळझी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांशिवाय जग अंधारमय आहे, डोळ्यात प्रकाश नसेल तर जगाचे सौंदर्य पाहता येणार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात सुमारे 2.2 अब्ज लोक डोळ्यांच्या विकाराने त्रस्त आहेत. सोबतच ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण डोळ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास या समस्या टाळता येतात.

  • कॉम्प्युटरपासून दूर बसावे

डोळ्यांच्या (Eye) आरोग्यासाठी तुम्ही अभ्यास करत असाल किंवा ऑफिसचे (Office) काम करत असाल तरीही कॉम्प्युटरपासून योग्य अंतरावर बसणे आवश्यक आहे. याशिवाय जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा फोनमध्ये जास्त गुंतले असाल तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना हानी पोहोचू शकते.

डोळे दुखण्याच्या तक्रारी वाढू शकतात. म्हणून काम करताना संगणकापासून योग्य अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि गरज असेल तेव्हाच त्याचा वापर करावा.

  • डोळ्यांची तपासणी करून घ्या

तुमच्या डोळ्यांमध्ये कोणतीही समस्या नसली तरीही तुम्ही वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेत राहा. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे, कारण मधुमेह असणाऱ्या लोकांच्या डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होतो आणि जर तुम्हाला दीर्घकाळ मधुमेह असेल तर तुम्ही अंधत्वाचा धोका अधिक असतो.

  • पुरेशी झोप घ्या

डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी. स्लीपिंग डिसऑर्डरमुळे होणारी आणखी एक डोळ्याची समस्या म्हणजे अँटीरियर इस्केमिक ऑप्टिक न्यूरोपॅथी, जो ऑप्टिक नर्व्हचा एक घाव आहे. या आजारात रक्तवाहिन्यांना सूज येते, त्यामुळे ऑप्टिक नर्व्हमध्ये रक्ताभिसरण शक्य होत नाही आणि त्यामुळे हळूहळू दृष्टी क्षीण होऊ लागते.

Eye Care Tips
Weight loss: अजब-गजब! डाएटिंग नाही तर रोज पिझ्झा खाऊन वजन केले कमी
  • डोळे स्वच्छ करा

डोळे नियमितपणे स्वच्छ करावेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास खाज सुटणे, डोळे लाल होणे, जळजळ होणे, सूज येणे यासारख्या समस्या वाढू शकतात. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करता तेव्हा तुमचे डोळे स्वच्छ धुवावे. दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाण्याने डोळे धुवा.

  • पोषक तत्वांनी युक्त पहार्थांचे सेवन करावे

डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, ई, व्हिटॅमिन ए याला रेटिनॉल असेही म्हणतात. हे दृष्टीसाठी चांगले मानले जाते. रताळे, गाजर, भोपळा, संत्री, हिरव्या भाज्यांमधून तुम्हाला अ जीवनसत्व मिळू शकते.

याशिवाय व्हिटॅमिन बी साठी तुम्ही डाळी, बीन्स, मासे, दही, दूध आणि बदाम खाऊ शकता. व्हिटॅमिन सी डोळ्यांना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते. कॉर्निया आणि स्क्लेराची रचना राखण्यास मदत करते. यासाठी ब्रोकोली, बटाटे, लिंबूवर्गीय फळे खा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com