झाशीच्या राणीची वीरगाथा पहावयास मिळणार नृत्यनाटिकेच्या रुपात!

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर सुभद्राकुमारी चौहान यांनी लिहिलेल्या ‘झांसी की रानी’ या काव्यावर आधारीत एक नृत्यनाटिकेची रचना करण्यात आली आहे.
Queen of Jhansi
Queen of Jhansi Dainik Gomantak
Published on
Updated on

कथक आणि भरतनाट्यम् या दोन अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्य (Hindustani classical dance) शैली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (Hindustani classical music) यांचा मिलाफ असलेली नृत्यनाटिका, ‘वीरगाथा: झांसी की रानी’ (Queen of Jhansi) येत्या शनिवारी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता, कला आणि संस्कृती संचालनालयाच्या प्रयोगसांज ह्या उपक्रमात सादर होणार आहे.

या नृत्यनाटिकेला अठराशे सत्तावनच्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर सुभद्राकुमारी चौहान यांनी लिहिलेल्या ‘झांसी की रानी’ या काव्यावर आधारीत एक नृत्यनाटिकेची रचना करण्यात आली आहे.

Queen of Jhansi
टोमॅटोशिवाय बनवल्या जाणाऱ्या 'या' स्वादिष्ट भाज्या नक्की ट्राय करा

19 नोव्हेंबर ही राणी लक्ष्मीबाई यांची 193 जन्मतिथी तसेच यंदाचे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष. या दोन्हींचा मेळ घालून धाडस आणि सामर्थ्य यांचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाईचे चरित्र सादर करण्याचा आणि त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न या सादरीकरणा मार्फत केला गेला आहे.

या नृत्यनाटिकेचे दिग्दर्शन प्रेरणा पालेकर यांनी केले आहे. सुभद्राकुमारी चौहान यांच्या मूळ कवितेवर आधारून कृपा तेंडुलकर यांनी या नृत्यनाटिकेची संहिता लिहिली आहे. या नृत्यनाटिकेचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, अर्पिता शिरोडकर आणि वैष्णवी पै काकोडकर यांनी. आदिती मोरजकर यांची वेशभूषा रचना असून मार्क फर्नांडिस यांनी प्रकाश योजना केली आहे.

या नृत्यनाटिकेतल्या कथ्थक नर्तिका आहेत, कृपा तेंडुलकर, अर्पिता शिरोडकर, आदिती मोरजकर आणि प्रेरणा पालेकर तर भरतनाट्यम नर्तिका आहेत वैष्णवी पै काकोडे, निधी रायकर आणि श्रुती खोर्जुवेकर. संगीत साथ केली आहे दीप्ती गावस, साईश नायक दलाल, आकाश नाईक आणि मिहीर तलवडकर यांनी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com