टोमॅटोशिवाय बनवल्या जाणाऱ्या 'या' स्वादिष्ट भाज्या नक्की ट्राय करा

टोमॅटो ही एक भाजी आहे जी जवळपास प्रत्येक घरात रोज वापरली जाते.
Tomato Prices Rise: टोमॅटोशिवाय बनवलेल्या स्वादिष्ट भाज्या नक्की ट्राय करा
Tomato Prices Rise: टोमॅटोशिवाय बनवलेल्या स्वादिष्ट भाज्या नक्की ट्राय करा Dainik Gomantak

भाज्यांच्या सतत वाढणाऱ्या किमातींचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. विशेषत: टोमॅटोच्या वाढत्या किमती. अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव आधीच 60 ते 80 रुपयांवर आहे. आता दोन राज्यात त्याची किमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक भागात टोमॅटोचे भाव 100 रुपयांवर गेले आहेत. टोमॅटोची (Tomato) भाजी जवळजवळ सर्वांकडे बनवल्या जाते. तसेच आपण सॅलड (Salad) सुद्धा बनवतो. पण टोमॅटोशिवाय भाजी कशी बनवायची हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर यांचे उत्तर आमच्याकडे आहे.

* आलू रसदार

आलू रसदार ही अशीच एक रेसिपी आहे. ज्यामध्ये बहुतेक लोक टोमॅटो वापरतात. पण ही भाजी तुम्ही टोमॅटोशिवायही बनवू शकता. ही भाजी बनवण्यासाठी बटाटा, तेल, जिरे, आले, दही, मीठ, तिखट इत्यादिची गरज असते. हे बनवण्यासाठी आणि भाजीला चव आणण्यासाठी तुम्ही टोमॅटोएवजी दही वापरू शकता.

*आचारी आलू रेसिपी

आचारी आलू ही एक भाजी आहे जी प्रत्येक भारतीय घरात अनेक प्रकारे तयार केली जाते. तुम्ही रात्रीच्या वेळी जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी कधीही आचारी आलू बनवू शकता. ही भाजी बनवण्यासाठी टोमॅटोची गरज नाही. तुम्ही रोटी, पराठा,नान किंवा पुरीसोबत सर्व्ह करू शकता.

Tomato Prices Rise: टोमॅटोशिवाय बनवलेल्या स्वादिष्ट भाज्या नक्की ट्राय करा
Hearty Brunch: गोव्यातील हे 4 कॅफे तुम्हाला माहिती आहेत का?

* हिंग-धणे मसालेदार बबटाटे

बटाटे हा बहुतेक लोकांचे आवडता पदार्थ आहेत, हिंग व्यतिरिक्त हिरवी मिरची, धने पावडर, मिरपूड आणि लिंबाचा रस हिंग-धणे मसालेदार बटाट्यामध्ये टाकले जातो, ज्यामुळे या बाटाट्याची भाजी मसालेदार बनते. तुम्ही ही भाजी टोमॅटोशिवाय बनवू शकता.

* फुलगोबी-बाटाटा

आपण नेहमी बाटाट्याच्या भाजीसोबत टोमॅटोच जास्त वापर करतो. पण टोमॅटोशिवाय तुम्ही स्वादिष्ट भाजी तयार करू शकता. आलू आणि गोबीची चवदार भाजी तुम्ही रोटी, पराठा आणि पुरीसोबत खावून आस्वाद घेवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com