Deficiency Vitamin D: शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास 'या' पदार्थांचा आहारात करावा समावेश

Deficiency Vitamin D: व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी आवश्यक असते. यामुळे हाडे,रक्तदाब,दात आणि स्नायुंच्या आरोग्यावर परिणाम होतो.
Vitamin D
Vitamin DDainik Gomantak
Published on
Updated on

Deficiency Vitamin D: निरोगी आरोग्यासाठी शरीरात अनेक व्हिटॅमिन्स असणे गरजेचे असते. यामध्ये व्हिटॅमिन डी देखील आरोग्यासाठी खुप महत्वाचे आहे. या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

यामुळे थकवा, तणाव येणे यासारख्या समस्या वाढतात. व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी मार्केटमध्ये विविध गोळ्या औषध उपलब्ध आहेत. परंतु या व्हिटॅमिनची करतरता भरून काढण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.

गाईचे दूध

व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून खाढण्यासाठी गायीचे दूध देखील फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लो फॅट दुधाऐवजी फुल क्रीम दूध प्यायल्याने जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मिळते.

दही

दही खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण होते. नियमितपणे आहारात दह्याचे सेवन करावे. यामुळे केवळ व्हिटॅमिन डीचा पुरवठा होत नाही तर शरीराला अनेक पोषक तत्वे देखील मिळतात.

संत्र्याचा रस

संत्रा आणि लिंबाचा रस देखील व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. ताज्या संत्र्याचा रस नियमित प्यायल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होते. हे आरोग्यासाठी इतर अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

सॅल्मन मासे

सॅल्मन फिशमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत मानला जातो. याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढता येते आणि अनेक समस्या टाळता येतात.

अंडी

व्हिटॅमिन डीच्या सर्वोत्तम स्त्रोतामध्ये अंड्याचाही समावेश आहे. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळते. अंड्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

उन्हात बसावे

तुम्ही सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळवु शकता. प्रत्येक ऋतूत सकाळी 8 ते 11 या वेळेत उन्हात बसणे फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात 20 ते 25 मिनिटे आणि हिवाळ्यात दोन तास बसणे फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीर विटामिन डी मुबलक प्रमाणात शोषून घेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com