Easy Snacks Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा पोटॅटो पिलो

तुम्ही लहान मुलांना स्नॅक्समध्ये झटपट पोटॅटो पिलो तयार करून देऊ शकता.
Easy Snacks Recipe
Easy Snacks RecipeDainik Gomantak

Easy Snacks Recipe: लहान मुलांना रोज नवनवे पदार्थ खायला आवडतात. यामुळे मुलांना रोज वेगवेगळे कोणते पदार्थ द्यावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहेत. जी बनवायला सोपी असून झटपट तयार होते. बटाट्यापासून बनवलेले पदार्थ लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

पोटॅटो पिलो बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2-3 मध्यम आकाराचे बटाटे

एक वाटी मैदा

अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

Easy Snacks Recipe
Health Care Tips: दिवाळीत पोटासंबंधित आजार निर्माण झाले असेल तर करा 'हे' सोपे उपाय

कृती

सर्वात पहिले बटाटे उकळून त्याची साल काढावी. बटाटे सोलल्यानंतर ते चांगले मॅश करावे. बटाटे अशा प्रकारे मॅश करा की त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता त्यात मीठ आणि काळी मिरी घालावे. पीठ घातल्यावर चांगले मळून घ्यावे. त्यापासून परफेक्ट पीठ तयार करा. पीठ अर्धा तास बाजूला झाकुण ठेवाने. यानंतर त्याचे छोटे गोळे बनवा आणि त्यांना आपल्या हातांनी बिस्किटांचा आकार द्यावे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला आकार देऊ शकता. ते तयार झाल्यावर कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्यावे. तुमचा पोटॅटो पिलो तयार आहेत. गरमागरम सॉस आणि चटणीसोबत सर्व्ह करून आस्वाद घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com