Shravan Tips: श्रावण उपवास सोडण्यासाठी या गोड डिश ट्राय करा, बोटं चाखत रहाल

Shravan
Shravan Dainik Gomantak
Published on
Updated on

श्रावण सोमवाराचे उपवास (shravan somwar upwas) सुरू झालेत, अनेक लोकं कडक श्रावण पाळतात. श्रावण उपवास सोडण्यासाठी गोड धोड करण्याची प्रथा आहे. प्रत्येकवेळी काय नवीन करायचे म्हणून वेळ मारून नेली जाते आणि पारंपारिक पदार्थ केले जातात. यावेळी तसं न करता रव्याचे लाडू, मालपुआ आणि मिल्क केक पराठे या स्विट डिश तुम्ही ट्राय (Sweet Dish) करू शकता. आता त्या करायच्या कशा याची सोपी पद्धत खाली देत आहोत.

मिल्क केक पराठा

आवश्यक साहित्य

मिल्क केक - 7 -8, काजू - 10-15 तुकडे, बदाम - 15-20, पिस्ता - 2 चमचे, बेदाणे, मलई, पीठ, तूप किंवा लोणी.

रेसिपी

मिल्क केक पराठा बनवण्यासाठी आधी ड्राय फ्रुट्स भाजून घ्या आणि मिल्क केकमध्ये मॅश करा. आता त्यात मनुके आणि मिल्क केक घाला. पिठाचा गोळा तयार करून त्यात दुधाची लाथी भरून पराठ्याच्या आकारात लाटून घ्या व दोन्ही बाजूंनी पराठ्याप्रमाणे तव्यावर भाजून घ्या. बेक केल्यानंतर तुमचा पराठा तयार आहे.

Shravan
पणजी महानगरपालिकेकडून रस्ता दुरुस्तीची कामे

मालपुआ

आवश्यक साहित्य

गव्हाचे पीठ, वेलची, नारळ किंवा नारळ पावडर, साखर, दूध.

रेसिपी

मालपुआ बनवण्यासाठी प्रथम दुधात साखर टाकून तासभर ठेवा. नंतर पिठात नारळ पावडर आणि वेलची घालून चांगले मिक्स करा. त्यात दूध घालून चांगले पीठ बनवून घ्या. आता एका कढईत तूप गरम करा आणि एका मोठ्या चमच्याच्या मदतीने ही पेस्ट तुपात चांगली घोळून घ्या. नंतर पुआ दोन्ही बाजूंनी तळून घ्या.

रव्याचे लाडू

आवश्यक साहित्य

रवा, साखरपूड, मावा, तूप, काजू, वेलची

रेसिपी

रव्याचे लाडू बनवण्यासाठी प्रथम रवा तुपात तळून घ्या. आता एका भांड्यात काढून थंड होऊ द्या. आता एका कढईत मावा हलका तपकिरी होईपर्यंत तळा. आता रव्यात मावा घाला. नंतर त्यात एका काजूचे 5 ते 6 तुकडे टाका. नंतर त्यात साखरपूड आणि वेलची पूड टाकून नीट मिक्स करून दोन्ही हातांनी लाडू बनवा.

Shravan
फिल्मी स्टाईलने कुख्यात गुंडाच्या आवळल्या मुसक्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com