Vastu Tips: झोपताना 'या' गोष्टी डोक्याजवळ ठेऊ नका; नाहीतर...

वास्तुशास्त्राचा (Vastu Shastra) आपल्या जीवनात खूप प्रभाव पडतो. यातील काही गोष्टींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो तर काही गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो.
Do not keep these things while sleeping, they invite trouble
Do not keep these things while sleeping, they invite troubleDainik Gomantak
Published on
Updated on

वास्तुशास्त्राचा (Vastu Shastra) आपल्या जीवनात खूप प्रभाव पडतो. यातील काही गोष्टींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो तर काही गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो. रात्री झोपताना आपण अनेकदा काही गोष्टी डोक्याच्या खाली ठेवून झोपतो. त्यापैकी मोबाईल फोन (Mobile phone) सर्वात खास आहे. वास्तुशास्त्रानुसार रात्री काही गोष्टी डोक्या खाली ठेवून झोपणे चुकीचे मानले जाते. असे केल्याने आपल्याला आयुष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या कधीही डोक्या खाली ठेवल्या जाऊ नयेत हे जाणून घेऊया.

Do not keep these things while sleeping, they invite trouble
Vastu Tips: घरातील 'या' 5 गोष्टी उघड्या ठेवल्या तर होईल मोठे नुकसान

या गोष्टी डोक्या खाली ठेवू नका

इलेक्ट्रॉनिक गोष्टी: मोबाईल फोन, घड्याळ, फोन, लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी कधीही डोक्या खाली ठेवू नयेत. या गोष्टी कधीही फुटू शकतात. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींचा जीवनात नकारात्मक परिणाम होतो.

पुस्तके: पुस्तके, वर्तमानपत्रे किंवा कॉपी-रजिस्टर सारख्या गोष्टी देखील डोक्याजवळ ठेवू नयेत. वास्तुनुसार या सर्व गोष्टींचा व्यक्तीच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो.

डोक्याखाली पर्स ठेवून झोपणे चांगले नाही

पर्स: बरेच लोक डोक्याखाली पर्स घेऊन झोपतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त, नातेसंबंध देखील खराब होऊ लागतात.

Do not keep these things while sleeping, they invite trouble
Vastu Tips: मिठाचा योग्य वापर केल्यावर घरी येते सुख समृद्धी

पाणी: बरेच लोक झोपताना डोक्याजवळ पाण्याची बाटली घेऊन झोपतात. वास्तुनुसार असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा परिणाम कुंडलीतील चंद्रावर होतो. यामुळे मानसिक समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

रात्री कधीही आरसा पाहू नका

आरसा: डोक्याजवळ ठेवणे टाळा. वास्तुनुसार, झोपताना आपली सावली आरशात दिसू नये. यामुळे रात्री भितीदायक स्वप्ने पडतात आणि वैवाहिक जीवनात समस्या देखील येऊ शकतात.

औषधे: वास्तुशास्त्रानुसार, रात्री कधीही डोक्याखाली औषध घेऊन झोपू नये. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी आजारी असाल, तर झोपण्यापूर्वी त्याला औषध द्या आणि रात्री औषध त्याच्यापासून थोडे दूर ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com