Vastu Tips: अशा पद्धतीने चुकूनही ठेवू नका चपला, घरात येऊ शकते संकट

Vastu Tips: अशा पद्धतीने चुकूनही ठेवू नका चपला, घरात येऊ शकते संकट
Published on
Updated on

घरात सुख-समृद्धी येण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप उपयोगी असतात. वास्तूचे नियम सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेवर आधारित आहेत. घरातील प्रत्येक वस्तूसाठी वास्तुशास्त्रात (Vastu Tips) दिशा ठरलेल्या आहेत. वास्तुशास्त्रात शूज आणि चप्पल (Vastu Tips For Shoes) घरात ठेवण्याचेही वेगवेगळे नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरातील लोकांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागू शकतो.

Vastu Tips: अशा पद्धतीने चुकूनही ठेवू नका चपला, घरात येऊ शकते संकट
Sankalp Amonkar: 'उमेदवारीसाठी दिनेश राव अन् के. सी. वेणुगोपाल यांनी कोट्यवधी रुपये कमावले'

1. शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत. असे म्हणतात की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख-शांती निघून जाते. उलटे ठेवलेले चप्पल तुमचा पैसा येण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकतो.

2. घाईघाईत कुठेही शूज आणि चप्पल काढणे टाळावे. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. घरातील सदस्यांनाही आर्थिक अडचणीतून जावे लागेल. वास्तूनुसार शूज आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत.

3. चप्पल आणि शूज उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा संपते. ही दिशा लक्ष्मीची आहे आणि या दिशेला जोडे ठेवल्याने लक्ष्मीचा वास घरात राहत नाही.

4. वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल नेहमी कपाटात ठेवावी. हा वॉर्डरोब नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा. शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा शुभ मानली जाते.

5. बाहेरून येतानाही शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढावीत. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips: अशा पद्धतीने चुकूनही ठेवू नका चपला, घरात येऊ शकते संकट
'एका रात्रीत कोणी भ्रष्टाचारी होत नाही'; Goa काँग्रेस फुटीवर आसामचे CM Himanta Biswa यांची प्रतिक्रिया

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com