Bone Cancer: सततचा हाडांचा त्रास? 'ही' असू शकतात कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे; इग्नोर करणं पडू शकतं महागात

Symptoms Of Bone Cancer: हाडांच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. जेव्हा कर्करोगाच्या पेशी हाडांमध्ये वाढतात तेव्हा त्या हाडांच्या पेशींना नुकसान पोहोचवतात. हाडांच्या कर्करोगाला हाडांचा सारकोमा असेही म्हणतात.
Symptoms Of Bone Cancer:
Bone CancerDainik Gomantak
Published on
Updated on

हाडांच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. जेव्हा कर्करोगाच्या पेशी हाडांमध्ये वाढतात तेव्हा त्या हाडांच्या पेशींना नुकसान पोहोचवतात. हाडांच्या कर्करोगाला हाडांचा सारकोमा असेही म्हणतात. हा कर्करोग मांडीचे हाड, पिंडरीच्या हाडात होतो. शरीराच्या इतर भागांचा कर्करोग हाडांमध्ये पसरतो तसाच हाडांचा कर्करोग देखील शरीराच्या इतर भागात पसरु शकतो.

हाडांचा कर्करोग

दरम्यान, जेव्हा हाडांचा कर्करोग (Cancer) होतो तेव्हा त्याची लक्षणे सहसा सुरुवातीला दिसून येत नाहीत. ज्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची तीव्रता कळत नाही. हाडांचा कर्करोग गंभीर असतो आणि त्यावर तात्काळ उपचारांची आवश्यकता असते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, जर वेळेवर उपचार केले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. हाडांच्या कर्करोगाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. हे ऑस्टियोसारकोमा, कॉन्ड्रोसारकोमा आणि कॉर्डोमा आहेत. याशिवाय, फायब्रो सारकोमा देखील आहे. सुरुवातीला काही लोकांमध्ये या कर्करोगाची लक्षणे दिसून येतात.

Symptoms Of Bone Cancer:
Chicken Cancer Risk: चिकन खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? संशोधनातून खुलासा; नॉनव्हेज लव्हर्सची वाढली चिंता

हाडांच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत?

दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कोलॉजीचे एचओडी डॉ. विनीत तलवार सांगतात की, हाडांचा कर्करोग झाल्यावर सुरुवातीला काही लक्षणे दिसून येतात, यामध्ये हाडांच्या वेदनांचा समावेश आहे. चालताना किंवा हात वर करताना वेदना जाणवणे, सांध्यामध्ये वेदना जाणवणे. सांधेदुखी बहुतेकदा रात्री जाणवते. याशिवाय, कोणत्याही प्रकारची क्रिया करताना वेदना जाणवू शकतात. यासोबतच, प्रभावित भागात गाठीला सूज येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. याशिवाय, हाडे कमकुवत होतात आणि किरकोळ दुखापतीनेही ती तुटतात. याशिवाय, थकवा आणि वजन कमी होणे ही देखील त्याची लक्षणे असू शकतात.

Symptoms Of Bone Cancer:
Lung Cancer: शरीर देते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संकेत, 'या' लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या उपचार

काय करायचं

जर तुम्हाला वरील लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांना भेटण्यास उशीर करु नका. हाडांच्या कर्करोगाच्या काही प्रकरणांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात पूर्ण बरा होणे शक्य आहे. हाडांच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी एक किंवा अधिक शस्त्रक्रियांची आवश्यकता असते. तथापि, हाडांच्या कर्करोगाच्या उपचारानंतर त्याच्या पुनरावृत्तीची शक्यता जवळजवळ नगण्य असते. म्हणून, लक्षणे ओळखणे आणि ताबडतोब डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधणे गरजेचे ठरते. तसेच, कर्करोग आहे की नाही याची खात्री केल्यानंतर तात्काळ उपचार प्रक्रिया सुरु करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com