कमी बजेट मध्ये करा परदेशी सैर; 'या' शहरांना द्या भेट

काही लोकांना प्रवासाची खूप आवड असते, विशेषतः परदेश प्रवास करण हे अनेकांचे स्वप्न असते.
Travel
TravelDainik Gomantak
Published on
Updated on

काही लोकांना प्रवासाची खूप आवड असते, विशेषतः परदेश प्रवास (Travel) करण हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, कमी बजेटमुळे, लोक त्यांच्या इच्छा प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. मात्र, जगातील काही देशांमध्ये कमी पैशातही परदेश प्रवास सहजरित्या करता येतो. होय, काही निवडक परदेशी देशांच्या सहलीचे नियोजन करून, तुम्ही तुमची परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण करू शकता. (Do foreign tours on a low budget)

Travel
Menstrual Hygiene Day: प्रत्येक स्त्रीने मासिक पाळीत घ्यावी स्वच्छतेची काळजी

खरे तर परदेशात जाणे ही अनेकांची इच्छा असते, पण जास्त खर्च होण्याच्या भीतीने लोक परदेशात जाण्याचा विचार सोडून भारतातच पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखत असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही भारतात जेवढे पैसे प्रवास करू शकता तेवढे पैसे देऊन तुम्ही सहज परदेशात देखील जाऊ शकता.

नेपाळ सहलीची योजना करा

जर तुम्हाला सुंदर मंदिरे आणि बर्फाच्छादित पर्वत शिखरे पहायची असतील तर नेपाळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते. त्याचबरोबर नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर आणि जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टचे दिदिर हे नेपाळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकीच एक आहेत. तसेच, नेपाळच्या सहली भारतीयांसाठी पूर्णपणे व्हिसा आणि पासपोर्ट विनामूल्य आहेत.

मालदीवमधील सागरी साहस

समुद्राच्या लाटांमध्ये रोमांच करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी कमी बजेटमध्ये मालदीवचा प्रवास करणे हा एक योग्य पर्याय आहे. बहुतेक जोडप्यांचे आवडते ठिकाण मानले जाणारे, मालदीव त्याच्या सुंदर दृश्यांसाठी आणि समुद्रातल्या मौज मजेसाठी ओळखले जाते.

Travel
या वीकेंडला आपल्या मुलांसाठी बनवा सुपर टेस्टी कॉर्न मफिन्स, जाणून घ्या रेसिपी

सिंगापूरला फेरफटका

ज्यांना उंच इमारती आणि आकर्षक दृश्ये आवडतात त्यांच्यासाठी सिंगापूरचा प्रवास हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सिंगापूर हे जीवनशैलीसाठी ओळखले जाते. त्याच वेळी, सिंगापूरची सहल ही शॉपिंगची आवड असलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम ट्रिप देखील ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com