डायपरमुळे लहान मुलांच्या किडनीला धोका? व्हायरल व्हिडिओतील दावा डॉक्टरांनी काढला खोडून, वाचा काय म्हणाले

Diaper Kidney Damage Claim : व्हिडिओत करण्यात आलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून, डायपरचा थेट किडनीशी कसलाच संबंध येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Do Diapers Damage Babies’ Kidneys?
Diaper Kidney Damage Claim
Published on
Updated on

लहान मुलांना घातल्या जाणाऱ्या डायपरमुळे थेट किडनी (मूत्रपिंड) ला धोका निर्माण होतो, असा दावा करण्यात आला आहे. बाळांचे मूत्र सोषून घेणं आणि बाळ कोरडं राहावं यासाठी प्रामुख्याने डायपर वापरले जाते. पण, व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे लहान मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आता वैद्यकीय तज्ञांनी खुलासा केला आहे.

लखनऊ येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी या व्हायरल व्हिडिओ आणि यात केलेल्या दाव्याची पडताळणी केली. व्हिडिओत करण्यात आलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून, डायपरचा थेट किडनीशी कसलाच संबंध येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. डायपरचा जन्मजात बालकं ते तीन वर्षापर्यंतच्या बाळांसाठी मूत्र सोषून घेणे आणि त्यानं कोरडं ठेवण्यासाठी वापर केला जातो, असे डॉक्टरांनी सांगितले.

Do Diapers Damage Babies’ Kidneys?
Tripurari Poornima : विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

डायपरमुळे किडनीला कोणताही धोका नसला तरी योग्य काळजी न घेतल्यास यामुळे इतर संसर्गाचा धोका उद्धभवतो असे तज्ञांनी सांगितले. डायपर दर ३  ते ४ तासांनी बदलायला हवं. नाहीतर यामुळे त्वचा संसर्ग होण्याची भीती असते. तसेच, मूत्रसंसर्ग देखील होऊ शकतो याचा अप्रत्यक्षपणे किडनीवर काहीप्रमाणात परिणाम होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.

डायपरबाबात पालकांनी काय काळजी घ्यावी?

१)बाळाला नवीन डायपर घालण्यापूर्वी त्याची त्वचा व्यवस्थित स्वच्छ करुन घ्या.

२) गरज भासल्यास बेबी रॅश क्रिम अथवा नारळ तेल त्वचेवर लावा.

३) बाळासाठी मऊ, हवा खेळती राहील असे डायपरच निवडा.

४) डायपरला पर्यायी म्हणून इतर काही वापरणाऱ्या पालकांनी स्वच्छ आणि मऊ कापड वापरावे.

५) बाळ रात्री वारंवार लघवी करत असल्यास डायपर वापरु शकता पण, सकाळी आठवणीने ते बदलावे.

Do Diapers Damage Babies’ Kidneys?
IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

लहान मुलांमधील मूत्रसंसर्ग कसा ओळखावा?

लहान मुलांमधील मूत्रसंसर्ग इतरांच्या तुलनेत वेगळा असतो. यात ताप येणं, जळजळ होणं आणि मूत्राचा वास येणं अशा लक्षणांचा समावेश आहे. लहान मुलांमध्ये होणाऱ्या संसर्गजन्य आजारांबाबत योग्य काळजी घेण्याची गरज असते असे वैद्यकीय तज्ञ सांगतात. लक्ष न दिल्यास भविष्यात अडचणी वाढू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

मूत्रमार्गात विषाणुंच्या प्रवेशामुळे संसर्ग वाढीस लागतो. यात केवळ डायपरच नव्हे तर गोष्टींची देखील योग्य काळजी घेणं गरजेचे आहे. डायपर वेळेवर बदलणे, पाणी योग्य प्रमाणात देणे आणि स्वच्छतेची काळजी घेणं यांचा समावेश आहे. संसर्गजन्य आजारांबाबत मुलींची अधिक काळजी घ्यावी लागते, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com