Diwali Special Goa Tour: गोवा हे विविध कला आणि संस्कृती अशा नाविन्यपुर्ण गोष्टींनी नटलेले पर्यटन स्थळ आहे. येथे प्रत्येकाला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जायचे असते. गोव्याचे नाव ऐकताच व्यक्तीमध्ये एक ताजेपणा जाणवू लागतो. तसे गोव्याला मनोरंजनाचे ठिकाण म्हटले तर वावगे ठरणार नाही. गोव्यातील संस्कृती (Goa Culture), क्लब्समधलं रंजक वातावरण आणि नाईट लाइफ (Night Life) पाहून गोव्याला पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं. जर तुम्ही यंदा दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. चला तर मग जाणून घेउया कधीही न पाहिलेलं गोव्याचं निसर्गरम्य ठिकाणे कोणती आहेत.
गोव्याचे (Goa) हे एक अनोखे संग्रहालय आहे. येथे तुम्हाला गोव्याचे जुने मार्ग, गोवन लोकांच्या चालीरीती पाहायला मिळतील. तसेच तुम्ही येथे रेस्टॉरंट, डान्स फ्लोअर आणि बऱ्याच गोष्टींचा आनंद घेता येईल.
आग्वाद किल्ला
आग्वाद किल्ला 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि दीपगृह आहे. हे सिंक्वेरिम बिचवर वसलेले आहे. हा किल्ला मुळत: डच आक्रमणाविरुद्ध बांधला गेला होता. गोव्यातील (Goa) एक भव्य प्रेक्षणीय भव्य स्थळ म्हणून ओळखले जाते. यामुळे गोव्याला गेल्यावर या किल्ल्याला नक्की भेट द्या आणि फोटो काढायला विसरू नका.
दूधसागर धबधबा
गोव्यातील (Goa) दूधसागर धबधबा हे अनेक पर्यटकांचे मन वेधून घेणारे ठिकाण आहे. हा धबधबा मंडोवी नदीवर वसलेले आहे. तुम्ही येथे जीप सफरीचा आनंद घेवु शकता. दूधसागर धबधबा हा भारतातील पाच सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. सुमारे 310 मीटर उंचीचा आणि 100 फूट रुंदीचा दूधसागर धबधबा पाहताना असे वाटते की, डोंगरातून दूध खाली येत आहे. निसर्गरम्य सौंदर्य आणि विलोभनीय वातावरणामुळे हा धबधबा गोव्याजवळ भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. 2013 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट चेन्नई एक्सप्रेसमध्ये देखील हा भव्य चार-स्तरीय धबधबा दाखवण्यात आला होता. पण तुम्हाला जर खरा आनंद घ्यायचा असेल तर येथे तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी जाउ शकता.
अंजुना फ्ली मार्केट
गोव्यात धबधबा, किल्लेसह तुम्ही शॉपिंगचा देखिल आनंद लूटू शकता. येथिल अंजुना फ्ली मार्केट (Anjuna Flea Market) हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे फ्ली मार्केट फक्त बुधवारीच सुरू असते. येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते कपडे आणि फळांपर्यंत अनेक गोष्टी ऑफरवर खरेदी करू शकता. विदेशातून आलेल्या पर्यटकांसह (Tourist) अनेक लोकांचे हे एक आवडते ठिकाण आहे.
बॅसिलिका ऑफ बॉम जीसस
गोव्यातील हे एक अविश्वसनीय चर्च (Church) असून यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ही सुंदर वास्तुकला 1605 पासून आहे. हे रोमन कॅथोलिक बॅसिलिका ख्रिश्चन धर्माच्या इतिहासात एक महत्वाची खूण असल्याचे म्हटले जाते. गोव्यातील एक अतिशय महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तीन मजली या चर्चमध्ये एकूण चार दरवाज्यांनी प्रवेश करता येतो. यापैकी तीन दरवाजे लहान तर एक मुख्य दरवाजा आहे.
गोव्यात आल्यावर सर्वजण बीचवर फिरायला जातात. पण तुम्ही इथल्या लेण्यांचे दर्शन देखिल घेउ शकता. ज्या कलेचा प्रभाव असलेला भूतकाळ प्रतिबिंबित करतात. उदाहरणार्थ, गोव्यातील लामगौ लेणी, लॅटराइटपासून कोरलेली, जी काहीशी नाजूक आहे. मोठ्या प्रमाणात पाम वृक्षांनी वेढलेल्या, या लेणी गोव्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहेत. हे ठिकाण पणजीपासून (Panji) सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या बिचोलीममध्ये वसलेले आहे.
पहिल्यांदा गोव्याला जातांना घ्यावी काळजी
समुद्रकिनाऱ्यांना द्या भेट
गोव्याला प्रथमच भेट देणारे लोक अनेकदा लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांना (Goa Beach) भेट देण्यास प्राधान्य देतात. परंतु या ठिकाणी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळेल. यामुळे तुम्ही अशा समुद्रकिनाऱ्यांवर जाणे चांगले आहे, जे फारसे लोकप्रिय नाहीत. बटरफ्लाय बीच प्रमाणे, होलेंट बीच आणि गाल्गी बागा ही चांगली ठिकाणे आहेत.
जागतिक वारसा स्थळांना द्या भेट
जुने गोवा (Old Goa) हे 16व्या आणि 17व्या शतकात बांधलेल्या अनेक जागतिक वारसा स्थळांचे घर आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च येथे आवश्यक आहे आणि इतरही अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही अनेक प्रकारच्या वास्तुकलेचे सौंदर्य पाहू शकता.
दुचाकीचा पर्याय निवडा
तुम्ही गोव्याला जाणार असाल तर चारचाकीऐवजी दुचाकीचा पर्याय निवडा. हे तुम्हाला ट्रॅफिकसारख्या समस्यांपासून वाचवेल आणि तुमचे डेस्टिनेशन सहज फिरू शकाल. गोव्यात दुचाकीवरून प्रवास करून पैशाची बचत करू शकता.
साहसी खेळांचा आनंद घ्या
साहसी खेळांचा आनंद घेतल्याशिवाय गोव्यातील तुमची सहल अपूर्ण आहे. स्कूबा डायव्हिंग, कयाकिंग, जेट स्कीइंग, विंडसर्फिंग आणि पॅरासेलिंग हे येथे अतिशय लोकप्रिय साहसी खेळ आहेत. तुम्ही पहिल्यांदाच गोव्याला जात असाल तर यापैकी एक तरी साहसी खेळांचा आनंद घ्यावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.