Goa Monsoon Trip: पावसाळ्यात गोव्यातील धबधब्याकडे पर्यटक आकर्षित

पावसाळ्यात धो-धो वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात (Goa) पर्यटकांची धुम असते.
Goa Monsoon Trip:
Goa Monsoon Trip:Dainik Gomantak

- सपना सामंत

निसर्गरम्य सुंदरेने भरलेली सत्तरीची भूमी पर्यटकांसाठी ओढ निर्माण करणारी व निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्याचे एक महत्वाची केंद्र ठरत आहे. बारामाही वाहणारे इथले झरे, नद्या, ओहळ ह्यामुळे पर्यटक (Tourist) या स्थानावर आकर्षित होतच असतात. पावसाळा जोरावर आला की पावसाळ्यात धो-धो वाहणाऱ्या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी गोव्यामधुन (Goa) तसेच गोव्याबाहेरुन येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते.

यंदा आताच पावसाने (Monsoon) जोर पकडला आहे. डोंगरमाथ्यावरून धबधबे ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांना त्याचीच प्रतिक्षा असते. धबधबे वाहायला सुरुवात होण्याची ते वाटच पहात असतात शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांची पावले- नव्हे दुचाक्या आणि चारचाकी वाहने या अश्या धबधब्याकडे मोठ्या संख्येने सहलीसाठी त्या दिशेला वळतात. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला कुणाला आवडत नसते? .

सत्तरीत (Satari) तर दरवर्षी पावसाळी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. शनिवार - रविवारी धबधब्यावर (Waterfall) पर्यटकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. सत्तरीतील ग्रामीण भागात वाहणार्या या धबधब्यांखाली मनसोक्त भिजायला, उधाणलेल्या जलप्रपाताचा आनंद लांबचा प्रवास करुन पर्यटक येतात.

Goa Monsoon Trip:
Goa Monsoon Trip: गोव्याला पावसाळ्यात जायचा विचार करत असाल, तर 'या' रेस्टॉरंट्सला नक्की भेट द्या

सत्तरीतील सालेली, झर्मे, नानेली, ब्रम्हाकरमळी, शेळप बुद्रुक, चोर्ला घाट, पाली, हिवरे, शेळप, साट्रे, कुमठळ, करंजोळ, तुळस कोंड, मोले, रिवे, चरावणे तसेच सत्तरीतील इतर भागात अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे वाहतात. सत्तरीतील हे धबधबे हे अलिकडच्या काळात बरेच नावारुपास आलेले आहेत. अनेक वेळा या ठिकाणी येणारे पर्यटक दंगा मस्ती करुन धागधिंगाणाही घालतात त्यामुळे शुद्ध निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायला आलेल्या इतर पर्यटाकांचा विरस होतो व स्थनिकांनाही त्याचा अतिशय त्रास होतो. अशा अपप्रवृत्तीला आळा बसणे मात्र गरजेचे आहे. ह्या पर्यटक स्थळांवर (Tourist places) आवश्यक ती सुरक्षा आणि सुविधा पुरवणे गरजेचे आहे

सत्तरीतील धबधबे हे म्हाईय अभयारण्य क्षेत्रात येतात. त्यामुळे प्रवेश फी अदा करूनच यापैकी अनेका धबधब्यांवर जाता येते. गे्ल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे फार कमी पर्यटकांनी धबधब्यांना भेट दिली. पण आता सारी बंधने शिथिल झाल्यामुळे यंदा मात्र पर्यटकांची संख्या लक्षणीय असणार याबद्दल शंका नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com