Vitamin Deficiency: शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास अनेक आजार उद्भवतात. यामध्ये व्हिटॅमिन ए,बी,सी, डीची शरीरात कमतरता असेल तर हाडं कमकुवत आणि रक्त पातळ होण्याची समस्या वाढू शकते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. यामुळे रक्त देखील पातळ होते. तसेच दुखापत झाल्यावर रक्त वाहणे थांबत नाही. अनेकवेळा अंतर्गत रक्तस्त्राव होऊन होडे कमकुवत होऊ शकतात. व्हिटॅमिन के रक्त गोठण्यापासून ते हाडांना मजबुत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया या व्हिटॅमिनची कमतरता कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.
केळीची पाने
हेल्थलाइच्या रिपोर्टनुसार, केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. १०० ग्रॅम केळीची पानांमध्ये ८१७ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन असते. याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन्सची कमतरता भरून निघते. यामुळे केळीच्या पानांचे नियमितपणे सेवन करावे.
मोहरीच्या पानांची भाजी
व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. मोहरीच्या भाजीमध्ये ५९३ मायक्रोग्रॅम के असते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी,खनिज, फायबर असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
पालक
पालक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये फायबर, खनिजे, व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. पालकमध्ये के आणि ओ व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या आहारात पालकाचा समावेश करावा. तुम्ही पालक सुप, भाजी किंवा भजी स्वरूपात पालकाचे सेवन करू शकता.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. यामुळे व्हिटॅमिन केची कमतरता असेल तर ब्रोकोलीचे सेवन करावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच पचन संस्था सुरळित कार्य करते. मधुमेहींनी देखील ब्रोकोलीचा आहारात समावेश करावा.
चिकन
चिकनमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. पोषक तज्ञांच्यामते १०० ग्रॅम चिकनमध्ये ६० मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के असते. यामुळे तुम्हाला जर फिट आणि निरोगी राहायचे असेल तर आठवड्यातून तीनवेळा चिकन खाऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.