Vastu Tips: क्रिस्टल कमळाचे आहेत अनेक फायदे; घराच ठेवल्यास होईल आर्थिक लाभ

Crytal Lotus
Crytal Lotus Dainik Gomantak
Published on
Updated on

कमळाचे फूल आरोग्य, नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कमळाचे फूल घरात ठेवल्याने नकारात्मक शक्ती (Negative Energy) नष्ट होतेच, शिवाय कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. फेंगशुई शास्त्रामध्ये क्रिस्टल कमळाचे (Crystal Lotus) अनेक फायदे सांगितले आहेत. क्रिस्टल कमळ घरात ठेवणे शुभ मानले जाते. क्रिस्टल कमळामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. चला तर मग क्रिस्टल कमळ घरी ठेवण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.

Crytal Lotus
गोव्याला येत असताना नेपाळ येथील मजूरांचा अपघात, चारजण जागीच ठार

क्रिस्टल कमळाचे फायदे

फेंगशुई शास्त्रानुसार घरामध्ये क्रिस्टल कमळ ठेवल्याने धन, सुख आणि समृद्धी वाढते. घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. क्रिस्टल कमळामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतात. क्रिस्टल कमळामुळे आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते. मन उत्साही राहते. मन सकारात्मक राहिल्याने कामात अडथळे येत नाहीत.

क्रिस्टल कमळ कुठे ठेवाल

फेंगशुई शास्त्रानुसार क्रिस्टल कमळ योग्य दिशेने ठेवले तर फायदेशीर ठरते. घरातील कोणत्याही खिडकीजवळ क्रिस्टल कमळ ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घराच्या नैऋत्य भागात क्रिस्टल कमळ ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. तसेच, कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात त्याची स्थापना केल्याने संपत्ती वाढते.

क्रिस्टल कमळ घरात स्थापन करताना त्याच्या पाकळ्या सर्वत्र पसरलेल्या आहेत का याची काळजी घ्या.

Crytal Lotus
बेपत्ता पत्रकार नितीन गोलतकर सुखरुप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com