गोव्याला येत असताना नेपाळ येथील मजूरांचा अपघात, चारजण जागीच ठार

बसमध्ये सुमारे 150 मजूर होते
गोव्याला येत असताना नेपाळ येथील मजूरांचा अपघात, चारजण जागीच ठार
Published on
Updated on

कामासाठी गोव्यात (Goa) येणाऱ्या नेपाळ (Nepal) येथील मजूरांच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार झाले असून, 24 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या बसमध्ये सुमारे 150 मजूर होते, अशी माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) येथे आज (09 सप्टेंबर) पहाटे हा अपघात झाला. जखमी मजुरांना उपचारासाठी बाराबंकी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, नेपाळमधील काही मजूर कामाच्या शोधात गोव्याला येत होते. एका बसमधून ते प्रवास करत असताना त्यांची बस पंक्चर झाली. बसचा पंक्चर काढण्यासाठी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे रस्त्याच्या कडेला बस उभी करण्यात आली होती. उभ्या असलेल्या बसला भरधाव ट्रकनं जोरात धडक दिली. या धडकेत बसमधील चारजण जागीच ठार झाले तर, 24 हून अधिक लोक जखमी झाले.

बस मधील सर्व मजूर हे नेपाळ येथील होते अशी माहिती समोर आली आहे. डबल डेकर असलेली ही बस बहराइच जिल्ह्यातील रुपाडिहा येथून गोव्याला जात असताना महंगुपूर गावाजवळ ती पंक्चर झाली. बसचा चालक रस्त्याच्या कडेला बसचा टायर बदलण्याच काम करत होता. तेव्हा पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com