Sameer Amunekar
पालक भाजी आणि मॅग्नेशियमयुक्त असल्यामुळं शरीराला अनेक फायदे होतातय. तसंच रक्तवाहिन्या सैल करण्यास मदत होते. पालक फायबरयुक्त असल्याने हृदयासाठी फायदेशीर ठरते.
बीटमध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तदाब कमी करतात. बीटचा रस प्यायल्यानं लगेच शरिरावर परिणाम दिसतो. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी बीटचा आहारात समावेश करणं चांगलं आहे.
गाजर अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियमयुक्त आहे. गाजर खाल्ल्यानं रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारते. हृदयाच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त आहे.
ब्रोकोली फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतं. ही भाजी हृदयाच्या आरोग्यास मदत करते.
मेथी खाल्ल्यास कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रणासाठी मेथी उपयुक्त आहे.
फ्लॉवर आणि कोबीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतं. या भाज्या रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात. अन्नपचनही सुधारण्यास मदत होते.
काकडी भरपूर पाणी आणि पोटॅशियमयुक्त आहे. काकडी खाल्ल्यास शरीर हायड्रेट ठेवते आणि रक्तदाब कमी करते.