Diabetes Tips For Monsoon: पावसाळा मधुमेहींसाठी त्रासदायक! असे जपावे आरोग्य

पावसाळा सुरू झाला असून अनेक आजार देखील सोबत घेऊन आला आहे.
Diabetes Treatment Research
Diabetes Treatment ResearchDainik Gomantak
Published on
Updated on

Diabetes Tips For Monsoon: पावसाळा सुरू झाला असून अनेक आजार देखील सोबत घेऊन आला आहे. यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. खास करून मधुमेहींना काळजी घेणे गरजेचे असते. या लोकांना संसर्गजन्य आजारांना लावकर बळी पडतात. त्यामुळे या रूग्णांना पावसाळ्यात आरोग्याची खास काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

  • मधुमेहींसाठी पावसाळा धोकादायक का आहे 

तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात मधुमेहाचे रुग्ण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. कारण यावेळी हवामानात अनेक बदर होत असतात. याशिवाय जलप्रदूषण, शिळे अन्न, पाणी यामुळे होणारे अनेक आजारही या रुग्णांसाठी धोकादायक ठरतात. त्यामुळे या दिवसांमध्ये मधुमेही रुग्णांनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहावे.  

  • पावसाळ्यात मधुमेही रुग्ण या आजारांना बळी पडू शकतात    

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेह असणारे रूग्ण लवकरच जिवाणूजन्य आजारांना बळी पडतात. यामुळे तुम्हाला जर मधुमेह असेल तर बुरशी, त्वचेचा संसर्ग आणि पचनासंबंधित आजारांपासून बचाव करावा. पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत होत असल्याने हे रूग्ण असा आजारांना लवकर बळी पडतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, पायात बुरशीजन्य संसर्ग, अपचन, जुलाब यासोबतच त्वचा संसर्गाचा धोका मधुमेह असणाऱ्यांना होतो.  

Diabetes Treatment Research
Arjun Bark Benefits: 'या' झाडाच्या सालीचे आहेत 6 चमत्कारी फायदे
  • पावसाळ्यात मधुमेही रुग्णांनी अशी काळजी घ्यावी 

मधुमेही रुग्णांनी पावसाळ्यात ताजे अन्न खावे आणि स्वच्छ पाणी प्यावे. 

पावसाळ्यात पाणी उकळून पिणे चांगले

या दरम्यान तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवा जेणेकरून बॅक्टेरियाचे आजार तुमच्या आजूबाजूला पसरणार नाहीत. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मसाले आणि भाज्यांचे सेवन करावे.

बाहेरचे अन्न खाणे टाळावे.

अन्न नीट शिजले नाही किंवा शिळे झाले तर तुम्ही अतिसाराचा बळी होऊ शकता. 

बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचे शूज घालूनच बाहेर जावे. 

डासांपासून बचाव करणे आवश्यक आहे कारण कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे डेंग्यूचा धोका जास्त असू शकतो. 

सतत पाणी पीत राहा आणि शारीरिक व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com