मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करणे कठीण काम आहे. मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. अश्या रुग्णांनी आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा दाखवल्यास हा रोग धोकादायक ठरू शकतो. काही रुग्ण मधुमेहाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत आणि याचमुळे इतर आजारांना बळी पडतात. पण या लोकांनी ही झाडे (Trees) आपल्या घरात लावल्यास मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
* कोरफडचे झाड (Aloe vera tree)
कोरफडचे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी लाभदायी आहे. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए , सी, बी1 , बी2 , बी3 , बी6, फाॅलिक ॲसिड हे पोशाक घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. यातील पोषक घटकामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णाना फायदा होतो. कोरफडेचे सेवन केल्याने मधुमेह नियत्रंणात राहते. मधुमेह आजारावर कोरफड रामबाण उपाय आहे.
* इंसुलिन प्लांट (Insulin plant)
आयुर्वेदात इंसुलिन (Insulin plant) प्लांटला खूप महत्व प्राप्त झाले आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांनी आपल्या घरात हे झाड नक्की लावावे. याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहते. या झाडाच्या पानांना आंबट चव असते. या पानाचे सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. तसेच या झाडाच्या कदाचा सूप पिल्याने अनेक आजार दूर राहतात.
* स्टीविया प्लांट (Stevia plant)
स्टीव्हिया (Stevia plant) ही वनस्पती मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी लाभदायी ठरते. याची पाने चवीला गोड असतात. या पानाचा वापर आपण सुकवून पावडर बनवू शकतो, ही पावडर चहा किंवा शरबतमध्ये टाकून सेवांकरू शकतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळते. कॅलरीज प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी मदत करते. या वनस्पतीला मोठी तुळस असे देखील बोलल्या जाते
* कडूलिंबाचे झाड (Neem tree)
कडूलिंबाचे झाड प्रत्येकांच्या घरासोमर पाहायला मिळते. आयुर्वेदातसुद्धा या झाडाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी याची पाने फायदेशीर असतात. कडुलिंबाची पाने चवीला कडू असतात. या झाडाचे पान, खोड याच्या बिया सर्व आरोग्यासाठी लाभदायी असते. कडूलिबाच्या पानांमध्ये संसर्गजन्य आजार दूर करणारे घटक असतात. तसेच रक्तातील साखरचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.