Health Tips: उपाशी राहिल्याने वाढतो शुगरचा धोका

(Health Tips) मधुमेहाच्या रुग्णांनी साखर कमी करण्यासाठी दररोज वेळेत केला पाहिजे नाश्ता
Health Tips
Health TipsDainik Gomantak

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करणे कठीण काम आहे. मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. अश्या रुग्णांनी आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आहे. निष्काळजीपणा दाखवल्यास हा रोग धोकादायक ठरू शकतो. काही रुग्ण मधुमेहाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत आणि याचमुळे इतर आजारांना बळी पडतात.

Health Tips
Pistachio खाण्याचे '5' जबरदस्त फायदे

मधुमेह हा असाध्य रोग आहे

तज्ञांच्या मते, मधुमेह हा असाध्य रोग आहे, ज्याचे एकदा निदान झाले की ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. या आजारात आहाराबरोबरच योग्य दिनचर्या, योग्य आहार आणि रोजचा व्यायाम आवश्यक आहे. अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, दररोज नियमित वेळेत न्याहारी केल्याने रक्तातील साखरेचे नियंत्रणच राहते असे नाही तर ते कमीही होते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुम्हाला साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर उपाशी न राहता दररोज वेळेवर नाश्ता करा.

8:30 च्या आधी केला पाहिजे नाश्ता

NDO 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, मधुमेहाच्या रुग्णाने सकाळी 8:30 च्या आधी नाश्ता केला पाहिजे. यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते. या संशोधनात, अमेरिकेत 10,575 लोकांच्या खाण्याच्या कालावधीच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. या संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांनी सकाळी 8.30 च्या आधी नाश्ता केला त्यांच्यामध्ये साखर आणि इन्सुलिन प्रतिरोधक पातळी कमी होती.

Health Tips
Street food in Goa:चटपटीत 'स्ट्रीट फूड'ची मजा 

नाश्ता काय करावे

तज्ञांच्या मते, मधुमेही रुग्णांनी प्रथिने, फायबर, मोड आलेली कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांसह दिवसाची सुरुवात केली पाहिजे. यासाठी दही, अंडी, भाज्या, टोस्ट आणि फळे खाऊ शकतात. निर्धारित वेळेत संतुलित आहार घेतल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मधुमेही रुग्णांनी सकाळी दुधाचे सेवन करावे, असेही एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com