Diabetes: मधुमेही रुग्णांनी दिवसातून किती वेळा साखरेची पातळी तपासावी? हालगर्जीपणा पडू शकतो महागात

How Often Should Diabetics Check Blood Sugar: मधुमेही रुग्णांनी वेळोवेळी त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. रुग्णांना आयुष्यभरासाठी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे असते.
Healthy Desserts For Diabetics
DiabetesDainik Gomantak
Published on
Updated on

मधुमेही रुग्णांनी वेळोवेळी त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. मधुमेह झाल्यानंतर व्यक्तीला आयुष्यभरासाठी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. म्हणून त्यांनी त्यांच्या साखरेच्या पातळीची काळजी घेतली पाहिजे. एवढचं काय तर त्यांनी त्यांच्या साखरेच्या पातळीनुसार आपला दैनंदिन दिनक्रम आणि आहार ठरवला पाहिजे.

दरम्यान, मधुमेही रुग्णांनी दररोज त्यांच्या साखरेची पातळी तपासली पाहिजे, जेणेकरुन ती नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करता येतात. मात्र, काही रुग्ण आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदाच त्यांची साखरेची पातळी तपासतात. मग प्रश्न पडतो की, मधुमेही रुग्णांनी दिवसातून कधी आणि किती वेळा त्यांची साखरेची पातळी तपासावी? चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

Healthy Desserts For Diabetics
Diabetic Diet: गोड खाण्याची तल्लफ! मधुमेही रुग्ण खाऊ शकतात 'हे' गोड पदार्थ, वाचा काय सांगतात तज्ञ

लाइफस्टाइलमध्ये बदल करुन साखरेची पातळी नियंत्रित करता येते. तथापि, जेव्हा साखरेची पातळी अनियंत्रित होते तेव्हा डॉक्टरांची गरज भासते. काही रुग्णांना फक्त औषधांनीच त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित करता येते, तर काही रुग्णांना इन्सुलिन घ्यावे लागते. अशा परिस्थितीत, साखरेची पातळी तपासत राहणे गरजेचे ठरते. मात्र साखरेच्या पातळीत जर चढ-उतार होत जर असे असेल तर मधुमेहाच्या रुग्णासाठी ते खूप घातक ठरु शकते.

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी दिवसातून किमान दोनदा त्यांची साखरेची पातळी तपासली पाहिजे. ज्या लोकांना टाइप 1 मधुमेह आहे त्यांनी दिवसातून 4 किंवा त्याहून अधिक वेळा त्यांच्या साखरेची पातळी तपासणे गरजेचे ठरते. तर टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांना त्याची तीन ते चार वेळा आवश्यकता असते. ज्यांची साखरेची पातळी अनियंत्रित राहते त्यांना सर्वात जास्त गरज भासते. अशा रुग्णांची साखरेची पातळी कधीकधी इतकी कमी होते की त्यामुळे मृत्यू देखील ओढावू शकतो. म्हणून, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या साखरेची पातळी निश्चितपणे तपासली पाहिजे. रात्री झोपताना साखरेची पातळी 50 च्या खाली गेली तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

Healthy Desserts For Diabetics
Diabetes: मेधुमेही रुग्णांनो सावधान! डोळ्यांतील 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो

मधुमेही रुग्णांनी एकदा रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर पुन्हा एकदा त्यांच्या साखरेची पातळी तपासली पाहिजे. यासोबतच रात्री झोपण्यापूर्वीही तपासली पाहिजे. याशिवाय, HBA1C ची चाचणी देखील करावी. जेणेकरुन साखरेच्या पातळीचे सतत निरीक्षण करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com