तुमचे पकोडे बाजारात मिळतात तसे क्रिस्पी नाही होत का? आपण विचार करत असाल की शेवटी काय कमी पडले आहे किंवा या मिश्रणामध्ये काय जास्त झालं आहे? असे किती प्रश्न तुमच्या मनात घिरट्या घालत असतील. पण टेन्शन घेऊ नका, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या बनवलेल्या पकोड्यांना प्रत्येक वेळी क्रिस्पी आणि अप्रतिम टेस्ट देऊ शकता. (Crispy Pakoda Recipe)
अशा प्रकारे पीठ तयार करा
पकोड्यांसाठी पिठ तयार करतांना नेहमी थंड पाण्याचा वापर करा. पाण्याचे प्रमाण लक्षात घ्या. एकावेळी पुर्ण पाणी न घातला,हळूहळू पाणी घाला जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
तुम्ही पिठात तांदळाचे पीठ देखील घालू शकता, यामुळे पकोडे कुरकुरीत होतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉर्न फ्लोअरही वापरू शकता.
पीठ बनवताना तुम्ही त्यात काही थेंब गरम तेल टाकू शकता, यामुळे पकोडेही कुरकुरीत होतात.
पकोड्यांचे पीठ काळजीपूर्वक तयार करा, ते पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही यांची काळजी घ्या.
भाजी कापण्याची पद्धत सुद्धा माहीत असायला हवी. पकोड्यांसाठी तुम्ही जी काही भाजी कापत आहात, ती खूप बारीक किंवा खूप जाड कापलेली नसावी. भाजी कापून झाल्यानंतर थोडावेळ मीठ लावून ठेवा.
या गोष्टी लक्षात ठेवा
पकोडे तळण्यासाठी तेल योग्य प्रमाणात गरम करणे आवश्यक आहे, अन्यथा पकोडे मऊ होतील आणि कुरकुरीत होणार नाहीत.
पकोड्यांसाठी तेल पुरेसे गरम झाल्यावरच त्यात पकोड्यांचे मिश्रण घाला. मग ते कुरकुरीत तयार होतील.
आणि गरमागरम पकोडे सॉस किंवा दह्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.