Credit Card: तुम्हीही सणसुदीच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करताय? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी बजेट तयार करावे.अन्यथा तुमच्यावर आर्थिक ताण वाढू शकतो.
Credit Card
Credit CardDainik Gomantak

Credit Card: सणासुदीच्या काळात अनेक दुकानदार आणि क्रेडिट कार्ड कंपन्या खास ऑफर्स घेऊन येतात. पण या ऑफर्सच्या जाळ्यात न अडकता आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डवर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्यावर आर्थिक ताण वाढू शकतो. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

बजेट ठरवावे

सणासुदीच्या काळात खरेदी करेदी करतांना आपले आर्थिक बजेट ठरवावे. यामुळे तुमच्यावरचा आर्थिक ताण वाढणार नाही. बजेट ठरवताना इनकम, कर्ज आणि इतर आर्थिक जबाबदारी लक्षात ठेवाव्या. तसेच खरेदीला जाताना यादी तयार करावी. गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करणे टाळावे.

योग्य कार्डचा वापर

काही क्रेडिट कार्ड्स खास सणासुदीसाठी तयार केली जातात. त्यावर कॅशबॅक किंवा शून्य व्याजावर इएमआयसारखे आकर्षक पर्याय देतात. काही कार्डांवर वार्षिक शुल्क नसते किंवा कमी व्याजदर असतो.

क्रेडिट कार्डची लिमिट

सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर करताना त्याची लिमिट तपासावी. लिमिटपेक्षा जास्त खर्च केल्यास कंपन्या जास्त दंड आकारू शकते. तसेच तुमच्या सिबिल स्कोअरवर देखील परिणाम होऊ शकतो. अशावेळी क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या कंपनीला तात्पुरती मर्यादा वाढवण्याची विनंती करावी.

Credit Card
Online Shopping Tips: सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करण्यापुर्वी जाणून घ्या 'या' 6 गोष्टी

ट्रांजेक्शन तपासावे

सणासुदीच्या काळात खरेदीसाठी अनेक ट्रांजेक्शन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केले जातात. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्रेडिट कार्डवर केलेल्या ट्रांजेक्शनवर लक्ष ठेवावे. तसेच, पैशांची बचत करण्यासाठी क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सचा लाभ घ्यावा.

रिपेमेंट

क्रेडिट कार्डवर खरेदी करण्यापूर्वी रिपेमेंची योजना करावी. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल देय तारखेपूर्वी भरल्यास जास्त व्याज भरावे लागणार नाही. तसेच तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com