Online Shopping Tips: सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करण्यापुर्वी जाणून घ्या 'या' 6 गोष्टी

तुमच्यासोबत असे काही घडू नये यासाठी ऑनलाइन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Online Shopping Tips
Online Shopping TipsDainik Gomantak

Online Shopping Tips: सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक ऑनलाईन साइट्सवर मोठ्या सवलती देखील मिळतात. काही वस्तु इतक्या स्वस्त मिळताता की तुमचा विश्वास देखील बसत नाही. यामुळे कमी पैशात चांगल्या वस्तु खरेदी करण्याचा मोह कोणी आवरू शकत नाही. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात आणि लोकांचे बँक अकाउंट एका मिनिटांत खाली करतात. तुमच्यासोबत असे काही घडू नये यासाठी ऑनलाइन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

इंटरनेट कनेक्शन

सिक्योर इंटरनेट कनेक्शन तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती लीक होण्यापासून रंक्षत करतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार किंवा खरेदी फ्री वाय-फायचा वापर करून करू नका.

प्रायव्हेसी तपासावी

कोणत्याही साइटवरून खरेदी करण्यापूर्वी त्या साइटची प्रायव्हेसी पॉलिसी तपासावी. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

प्रतिष्ठीत साइटवरच खरेदी

केवळ सर्वोत्तम ऑफरसाठी कोणत्याही साइटवरून वस्तु खरेदी करू नका. जर तुम्हाला साइट्स माहित असेल तरच त्यांच्या अधिकृत साइटवरून खरेदी करावे. तुम्ही गुगलवर शॉपिंग साइट्सची यादी देखील शोधू शकता. लक्षात ठेवा की कमी फॉलोअर्स असलेल्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर फसवणुक अधिक होऊ शकते.

वैयक्तीत माहिती शेअर करू नका

कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. लक्षात ठेवा की खरेदी करण्यापुर्वी कोणतीही अधिकृत साइट कधीही तुमचा बँक पिन कोड नातेवाईकाचे नाव यासारखी माहिती विचारत नाही.

E-mailआणि जाहिरातींध्ये दिसणाऱ्या लिंक

जर तुम्हाला ईमेल किंवा जाहिरातींमध्ये खूप आकर्षक ऑफर दिसली तर त्यावर क्लिक चुकूनही क्लिक करू नका. सध्या फसवणुकीसाठी अशा लिंक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीने अशा लिंकवर क्लिक केल्यावर त्याची सर्व वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारा मिळते. त्यानंतर काही मिनिटांत बँक अकाउंट खाली होते.

क्रेडिट कार्ड

तुम्ही क्रेडिट कार्डने ऑनलाइन खरेदी करत असाल तर दर आठवड्याला दर दहा दिवसांनी ट्रांजेक्शन तपासावे. तुम्हाला यात काही गडबड आढळल्यास ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधावा. कारण तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com