Relationship Codependency: 'या'वरुन ओळखा तुमच्यात कोणतं नातं आहे

Relationship Co-Dependency: काळजीवाहू भूमिका निभावण्यातून दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची किंवा आपल्यावर कोणीतरी अवलंबून असण्याची प्रक्रिया सुरु होते.
Relationship
RelationshipDainik Gomantak
Published on
Updated on

Relationship Co-Dependency: आज प्रत्येक दिवसाबरोबर आपल्या जीवनशैलीत बदल होताना दिसतो. हा बदल फक्त खाणे-पिणे आणि कपडेलत्ते इथेपर्यंतच मर्यादित राहत नसून तुमच्या नात्यांवरही याचा मोठा परिणाम होतो.

माणूस नेहमीच आपली नाती, माणसे जपण्यासाठी प्रयत्न करत असतो कारण आपली नाती जितकी मजबूत असतात तितके आपण आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतो. मात्र अनेकदा त्यात कटूता आलेली दिसून येते.

एकमेकांप्रति प्रेम वाटूनही ही कटूता का निर्माण होतो? नात्यात अशी कटूता निर्माण होण्याची कोणती कारणे आहेत? महत्वाचे म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम वाटत नसूनही आपण एकमेकांपासून दूर का राहू शकत नाही? आपण प्रेमात आहोत म्हणून आपण एकत्र आहोत की आपण एकमेकांवर अवलंबून आहोत म्हणून एकत्र आहोत असे अनेक प्रश्न बहुतेकजणांना पडत असतात.

  • एकमेकांवर अवलंबून राहणे म्हणजे काय?

एखाद्या नात्यात एकमेकांमुळे आनंदी असणे , एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांमुळे आत्मविश्वास वाटणे महत्वपूर्ण गोष्ट आहे. मात्र या भावनांचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा एकमेकांवर अवलंबून राहणे वाढते आणि ते त्या नात्यासाठी आणि व्यक्तीसाठी हानीकारक असते.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन स्वतंत्र व्यक्ती जेव्हा भावनिकरित्या पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतात तेव्हा पुढे जाऊन ते एकमेकांची गरज बनतात.

Relationship
Eating Food Tips: एखाद्याचे उष्ट अन्न खाल्याने प्रेम नाही तर वाढतात आजार, वाचा तज्ञांचे मत
  • अवलंबित्व कशातून येते आणि त्याचे परिणाम काय आहेत?

तज्ञांनी म्हटल्यानुसार, काळजीवाहू भूमिका निभावण्यातून दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची किंवा आपल्यावर कोणीतरी अवलंबून असण्याची प्रक्रिया सुरु होते. यातून त्यागाची आणि समाधानाची भावना वाढीस लागते. सुरुवातीला हे वागणे काळजी आणि प्रेमाचे प्रतिक वाटते मात्र पुढे जाऊन हे वागणे दुसऱ्याच्या वागण्याला नियंत्रित करण्यामध्ये बदलते.

दुसऱ्या एका तज्ञांनी म्हटल्यानुसार दुसऱ्यावर अवलंबून राहणे ही काळजी करण्याची बाब नाही मात्र जेव्हा याचा अतिरेक होतो तेव्हा तुम्ही त्या नात्याबद्दल याबरोबरच तुमच्या स्वत:बद्दल विचार केला पाहिजे आणि मगच पुढचे निर्णय घेतले पाहिजेत.

'या' वागण्यातून कळेल तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहात की नाही?

1. नात्यातील सीमारेषा धूसर होत जाते.

2. एक व्यक्ती नेहमी तुमच्या कृती आणि निर्णय पूर्णपणे नियंत्रित करतो.

3. भांडण होऊ नये म्हणून चूक नसताना अपराधीपणा घेणे, आपण चूकल्याची कबुली देणे.

Relationship
Cleaning Tips: Mixer मधील डाग काढण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल ट्रिक्स

4. स्वत:च्या भावनांकडे दुर्लक्ष करणे.

5. आत्मविश्वास गमावणे.

6. नकाराची भीती वाटणे.

7. स्वत:साठी काही गोष्टी केल्या तर अपराधीपणाची भावना निर्माण होणे.

8. आपल्याला वाटणाऱ्या भावनांसाठी नेहमी इतरांवर अवलंबून असणे.

साधारणपणे एकमेकांवर संपूर्णपणे अवलंबून असलेल्या नात्यातील व्यक्ती अशा प्रकारचे वर्तन करत असतात. अशा समस्यांचा सामना करत असतात.

'हे' आहेत एकमेकांवर अबलंबून असण्याचे परिणाम

दोन व्यक्तींच्या नात्यात जेव्हा नेहमी एक व्यक्ती निर्णय घेत असतो आणि दुसरी व्यक्ती संपूर्णपणे त्याचे त्यानुसारच आपल्या आयुष्यात बदल करते तेव्हा या नात्यात पुढे अडचणी निर्माण होतात. जेव्हा दुसरा व्यक्ती स्वतंत्रपणे निर्णय घेतो तेव्हा पहिल्या व्यक्तीला आपण या नात्यात कमी पडल्याची असुरक्षतेची भावना निर्माण होते.

जे लोक एकमेकांवर अवलंबून असतात त्यांना काहीवेळा त्यांच्या नात्यात घुसमटदेखील जाणवते आणि एकमेकांपासून दूरही जाता येत नाही. अशा नात्याबद्दल तज्ञांनी असेही म्हटले आहे की, तुमच्या आई-वडीलांच्या नात्याचा किंवा लहानपणीच्या आठवणींचादेखील तुमच्या नात्यावर परिणाम होत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com