Eating Food: एकमेकांचे उष्ट पदार्थ खाल्याने प्रेम वाढते... असे तुम्ही एकले असेलच. पण घरात देखील अनेक लोकांना एकमेकांच्या ताटातल खायला आवडते. एकमेकांचे उष्ट खाल्याने प्रेम वाढत असे लव्ह बर्ड मानतात. पण तज्ञांच्या मते उष्ट अन्न खाल्याने आजार वाढू शकतात. यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
कोणते आजार होऊ शकतात
जेव्हा आपण एकमेकांचे उष्ट अन्न खातो तेव्हा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही आजारी व्यक्तीचे उष्ट अन्न खाल्ले तर तुम्हीही आजारी पडू शकता. तसेच एकाच ताटात खाल्याने सर्दी, ताप किंवा खोकला होऊ शकतो. यामुळे आजारी व्यक्तीसह एकत्र जेवणे टाळावे.
पचन संस्था
जेव्हा आपण दूसऱ्यांच्या ताटामधील अन्न खातो तेव्हा ते स्वच्छ आहे की नाही हे माहिती नसते. यामुळे अन्नातून बॅक्टेरिया पोटात प्रवेश करून पचना संबंधित आजार वाढू शकतात.
पोषक तत्वांची कमतरता
दुसऱ्याच्या ताटामधील अन्न खाल्याने शरीराला योग्य प्रमाणात पोषक घटक मिळत नाहीत. यामुळे शरीरात पोषण तत्वांची कमतरता जाणवते.
ऍलर्जी
दुसऱ्यांचे उष्ट अन्न खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. कारण दुसऱ्याचे अन्न शेअर केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्ही आजारी देखील पडू शकता.
जेवतांना कोणती काळजी घ्यावी
जेवण्यापूर्वी हात स्वच्छ पाण्याने धुवावे.
भाड्यांमधील अन्न काढतांना चमच्याचा वापर करावा.
जर एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदार्थाची ऍलर्जी असेल तर त्याने आधीच सांगावे.
उष्ट खाणे शक्यतो टाळावे. कारण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?
अशी काही फळे आहेत जी तुम्ही रिकाम्या पोटी सहज खाऊ शकता. परंतु अशी अनेक फळे आहेत जी तुम्ही ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या जेवणादरम्यान म्हणजेच 10 ते 12 च्या दरम्यान खाऊ शकता.
हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अशी अनेक फळे आहेत. ज्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ते सकाळी लवकर खाण्याऐवजी दुपारी 10-12 वाजेपूर्वी खावे.
रिकाम्या पोटी कोणते फळं खावे
1. किवी
किवीमध्ये भरपूर पोषक असतात. जे तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. डेंग्यू आजार झाला असेल तर किवी फळं खूप चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुरळित कार्य करते. शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.
2. सफरचंद
रिकाम्या पोटी तुम्ही सफरचंद खाणे आरोग्यादायी असते. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. बद्धकोष्ठता आणि गॅसपासून मुक्ती मिळेल. पचनसंस्था देखील सुरळित कार्य करते.
3. डाळिंब
डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असतात. तुम्ही रिकाम्या पोटी डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते.
4. पपई
पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पपई खाल्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता आणि पोटफुगीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.