Winter Care Tips: हिवाळ्यात च्यवनप्राश खाणे फायदेशीर, पण किती? वाचा एका क्लिकवर

हिवाळ्यात च्यवनप्राश खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Winter Care Tips|chyawanprash
Winter Care Tips|chyawanprashDainik Gomantak
Published on
Updated on

हिवाळा आला की घरातील प्रत्येकजण म्हणू लागतो की प्रत्येकाने च्यवनप्राश खावा. लहानपणापासून मुलं आपल्या आई-वडिलांकडून, आजी-आजोबांकडून या गोष्टी ऐकत असतात. वास्तविक, च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती असतात ज्या आपल्या शरीराला उबदार करण्याचे काम करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात ज्यामुळे शरीराला विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत होते. पण, तुम्हाला च्यवनप्राश खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? हे केव्हा आणि कसे खावे हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, येथे जाणून घ्या. 

  • किती आणि केव्हा खावे

च्यवनप्राश पुरेशा प्रमाणात खावे. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला पोट फुगणे, लूज मोशन इ. एक प्रौढ व्यक्ती दररोज सकाळ संध्याकाळ 1 चमचा च्यवनप्राश कोमट पाणी किंवा दुधासोबत घेऊ शकतो. जर तुम्ही मुलांना च्यवनप्राश देत असाल तर त्यांना सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा च्यवनप्राश द्यावा.

Winter Care Tips|chyawanprash
Long Distance Relationship मध्ये Follow करा या Tips..

कुटुंबात (Family) दम्याचे किंवा श्वासाचे रुग्ण असतील तर त्यांनी च्यवनप्राश दुधासोबत किंवा दह्यासोबत खाऊ नये. ज्यांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असेल तर तुम्ही दररोज 3 ग्रॅम च्यवनप्राशचे सेवन करू शकता.

  • फायदे

च्यवनप्राश शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण होते. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे आपले आरोग्य (Health) चांगले ठेवतात. च्यवनप्राशच्या सेवनाने प्रजनन क्षमताही वाढते. हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com