Chocolate Day 2023: यंदाचा चॉकलेट डे खास बनवण्यासाठी पहा या स्पेशल आयडिया, व्हॅलेंटाइन नक्कीच होईल इंप्रेस

चॉकलेट डे खास बनवण्यासाठी पाहा खास आयडिया
Chocolate Day 2023
Chocolate Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Chocolate Day 2023 Gift Ideas: व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरु झालाल आहे. आज व्हॅलेटाइन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्हीही तुमच्या पार्टनरला चॉकलेट्स गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर अनोख्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर तुम्ही या अनोख्या चॉकलेट गिफ्ट आयडिया फॉलो करु शकता.

  • चॉकलेटने घर सजवा

बुके किंवा बंच मध्ये चॉकलेट देणे आता बोरिंग झाले आहे. यंदा काही खास करायचे असेल तर संपूर्ण घर चॉकलेट्सने सजवू शकता. फ्रीज, बेडरूमची भिंत आणि घराचे दरवाजे चॉकलेट्सने सजवा. ही आयडिया नक्कीच तुमच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर स्माईल आणेल.

chocolate
chocolateDainik Gomantak
Chocolate Day 2023
Chocolate Day Special : 'चॉकोलेट डे'ला घरीच बनवा खास प्रकारचे चॉकलेट आईस्क्रीम; नात्यात वाढवा गोडवा
  • होममेड चॉकलेट्स

आता चॉकलेट डे (Chocolate Day) असल्याने गिफ्ट म्हणून चॉकलेट दिले जाते. पण मार्केटमधील सामान्य चॉकलेट देण्याऐवजी यात तुमच्यातील काही क्रिएटिव्हिटी समाविष्ट करा. इंटरनेटवर तुम्हाला अनेक होममेड चॉकलेट रेसिपी मिळतील. याच्या मदतीने घरीच स्वादिष्ट चॉकलेट तयार करा. त्यात नट, ड्रायफ्रुट्स, जॅम यांची चव घालून चव वाढवू शकता.

  • चॉकलेट सोबत गेम खेळा

जर तुमच्या पार्टनरची एखादी फेव्हरेट चॉकलेट डेझर्ट असेल तर तुम्ही त्याच्यासोबत चॉकलेट गेम देखील खेळू शकता. ज्यामध्ये त्याचे आवडते चॉकलेट किंवा डेझर्ट शोधण्यासाठी थोडे संकेत आणि कोड द्या. या प्रकारचा खेळ तुमचा दिवस खास बनवेल .

  • हॉट चॉकलेट

घराच मस्त एकत्र मिळून हॉट चॉकलेट बनवा आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. ही आयडिया देखील इंप्रेस करण्यासाठी पुरेशी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com