Chocolate Day 2023: दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारी हे दिवस व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. प्रेमीयुगलांसाठी हा दिवस खास असतो. आज व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे. या दिवशी कपल्स आपल्या जोडीदाराला आवडते चॉकलेट देऊन आपले मन व्यक्त करतात.
एकमेकांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचे काम करतात. तक्रारी दूर करून जवळीक वाढवतात. चॉकलेट (Chocolate) देऊन आनंद वाटून घेतात. या खास दिवशी चॉकलेट आईस्क्रीम बनउ शकता. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट आईस्क्रीम कसे बनवायचे आणि त्यात कोणते पदार्थ वापरले जातात.
चॉकलेट आईस्किम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
डेअरी क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम
आटवलेले दुध
कोको पावडर
भाजलेले बदाम
चॉकलेट चिप्स
दालचिनी पूड
चॉकलेट आईस्किम बनवण्याची कृती
कोणत्याही मिक्सिंग बाऊलमध्ये क्रीम ठेवा आणि 2 ते 3 मिनिटे चांगले फेटून घ्या.
क्रीम व्यवस्थित बसवा. क्रीम बीट करण्यासाठी बीटर वापरणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा जोपर्यंत क्रीम फ्लफी होत नाही तोपर्यंत आइस्क्रीम चांगले होणार नाही.
दुसऱ्या स्वच्छ बाउलमध्ये तुम्हाला कोको पावडर चाळायची आहे. त्यात दालचिनी पावडर देखील घाला
दोन चमचे व्हीप्ड क्रीम घाला आणि चांगले मिसळा.
शेवटी या मिश्रणात सर्व क्रीम टाका आणि चांगले मिक्स करा.
तुम्ही त्यावर ड्राय फ्रूट्स टाकू शकता.
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या मिश्रणात ओरियो बिस्किटे देखील ठेवू शकता.
हे मिश्रण सुमारे 3 तास फ्रीजमध्ये ठेवा.
3 तासांनंतर तुमचे चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे, त्यावर चोको चिप्स टाकून सर्व्ह करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.