Candolim Beach यासाठी गोव्यातील कांदोळी बीच आहे लोकप्रिय

Candolim Beach: कांदोळी बीच हा नाइटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखला जातो.
Candolim Beach
Candolim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Candolim Beach

कांदोळी बीच हा पणजीच्या पुढे उत्तर गोव्याच्या दिशेने, अग्वाद किल्ल्यापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. गोव्यातील कळंगुट, बागा आणि कांदोळी पार्टीसाठी लोकप्रिय बीच आहेत. हा समुद्रकिनारा तुलनेने कमी गर्दीचा आहे जो मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. कांदोळी बीच हा नाइटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखला जातो.

किनाऱ्यावर असलेल्या नारळाच्या झाडामुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कांदोळी बीचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिव्हर प्रिन्सेस हे जहाज 2000 पासून किनाऱ्यावर अडकले होते आणि आता ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. नाइटलाइफ, वॉटरस्पोर्ट्स, बीच शॅक्स, सीफूडसाठी हा गोव्यातील सर्वात आकर्षक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.

पर्यटनस्थळ:

कांदोळी बीच उत्तर गोव्यात असून तो कळंगुट बीच दरम्यान आहे. राजधानी पणजी आणि दाबोळी विमानतळावरून याठिकाणी सहज जाता येते.

Candolim Beach
Tropical Spice Plantation: ताजे मसाले खरेदी करायचे आहेत? थर मग गोव्यातील या मसाल्यांच्या शेतीला नक्की भेट द्या

निसर्गसौंदर्य:

कांदोळी बीच हा निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो. याठिकाणी स्वच्छ, सोनेरी वाळू आणि स्वच्छ पाणी आहे. कांदोळी बीचवर विविध जलसाठे आहेत जे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी देतात.

जलक्रीडा:

पॅरासेलिंग, जेट स्कीइंग आणि बनाना बोट राइड यांसारख्या विविध जलक्रीडांचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

Candolim Beach
Caves of Khandepar: गोव्यातील ही प्रसिध्द लेणी कधी पाहिली आहेत का?

निसर्गरम्य ठिकाणे:

ऐतिहासिक दीपगृह असलेल्या फोर्ट अग्वादसह समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

रेस्टॉरंट्स आणि शॅक्स:

समुद्रकिनाऱ्यावर अनेक शॅक आणि रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही स्वादिष्ट समुद्री खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता आणि समुद्रकिनारा पाहू शकता.

धार्मिक स्थळे:

समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक हिंदू मंदिरे आहेत ज्यांना धार्मिक तीर्थक्षेत्र मानले जाते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com