पाठीच्या पिंपल्समुळे बॅकलेस घालता येत नाही? फॉलो करा 'या' टिप्स

ज्या महिलांना बॅकलेस ड्रेस घालणे आवडते पण पिंपल्स पाठीचे सौंदर्य बिघडवतात, त्यामुळे लग्न आणि पार्ट्यांमध्ये पाठीला झाकून ठेवावे लागते.
Skin Care Tips
Skin Care TipsDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर पुरळ येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर खोलवर परिणाम होतो, परंतु काहीवेळा उष्णतेमुळे पाठीवर फोड आणि पिंपल्स देखील येऊ लागतात, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्षच करतो. पण ज्या महिलांना बॅकलेस ड्रेस घालणे आवडते त्यांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. हे पिंपल्स पाठीचे सौंदर्य बिघडवतात, त्यामुळे लग्न आणि पार्ट्यांमध्ये पाठीला झाकून ठेवावे लागते. (Can wear backless because of spinal pimples Follow these tips)

Skin Care Tips
उन्हाळ्यात घ्यावा पोषक आहार...

पाठीच्या पुरळांमुळे त्वचेच्या सौंदर्यालाच इजा होते असे नाही, तर या फोडांमुळे वारंवार शरीरावर खाज सुटते. सार्वजनिक ठिकाणी पाठ खाजवल्याने लोकांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आपली छाप खराब होते. आज आपण अशा काही उपायांबद्दल जाणून घेऊया ज्याने आपल्या या समस्येवर मात करू शकतो.

कोरफड :

आपल्या सर्वांना माहिती आहे की एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते, म्हणूनच अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये त्याचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. पाठीवरील पुरळ दूर करण्यासाठी कोरफडीचे पान तोडून त्याचे जेल काढा आणि काही वेळ फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवा. आता हे थंड जेल त्या प्रभावित भागावर लावा आणि सुमारे अर्धा तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

मध आणि दालचिनी :

मध आणि दालचिनी एकत्र करून एक पॅक तयार करा, यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत जे फोड आणि मुरुम दूर करण्यास मदत करतात. एक चमचा मध आणि दालचिनी पावडर एकत्र करून 15 मिनिटे पाठीवर लावून ठेवावे.

Skin Care Tips
जाणून घ्या केस धुण्याच्या योग्य पद्धती

ग्रीन टी :

ग्रीन टीचा (Green tea) वापर अनेकदा वजन कमी करण्यासाठी केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्वचेची काळजी घेण्यासाठी हा एक उत्तम उपचार देखील आहे. यासाठी एक कप ग्रीन टी तयार करा, त्यात कापसाचे गोळे बुडवून पाठीवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर त्वचा स्वच्छ धुवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com