Uric Acid: प्रोटीन्स वाढवतात यूरिक अ‍ॅसिड? जाणून घ्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात

Uric Acid: जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आपल्या शरीराला शक्ती देण्याचे काम करतात. शरीरात त्यांच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
Uric Acid: प्रोटीन्स वाढवतात यूरिक अ‍ॅसिड? जाणून घ्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात
Published on
Updated on

Uric Acid: जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आपल्या शरीराला शक्ती देण्याचे काम करतात. शरीरात त्यांच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. परंतु केवळ पोषक तत्वांची कमतरताच नाही तर शरीरात त्यांचे प्रमाण जास्त झाल्यास आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. काही लोक सांगतात की, शरीरात जास्त प्रथिने यूरिक अ‍ॅसिडची समस्या वाढवतात.

यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते

तज्ञांच्या मते, काही परिस्थितीत जास्त प्रथिनांमुळे यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. याचे कारण कार्ब्स आणि रिफाइंड साखर आहे. जर तुमच्या जेवणात या दोन्हीचे प्रमाण जास्त असेल तर शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात जास्त कार्बोहायड्रेट किंवा शुगर घेता तेव्हा शरीरात अतिरिक्त इन्सुलिन तयार होऊ लागते. यामुळे, मूत्रपिंड शरीरातून यूरिक अ‍ॅसिड काढून टाकू शकत नाहीत, ज्यामुळे यूरिक अ‍ॅसिडची समस्या उद्धभवते.

Uric Acid: प्रोटीन्स वाढवतात यूरिक अ‍ॅसिड? जाणून घ्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात
Heart Attack: विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका; संशोधनातून खुलासा

प्रथिनांचं सेवन कमी करु नका

पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय प्रथिने कमी करु नका. शरीरात प्रथिने कमी झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्हाला यूरिक अ‍ॅसिडची समस्या असेल तर आहारतज्ज्ञांकडून तुमचा डाइट प्लान घ्या आणि त्यानुसार तुमचा आहार ठेवा.

यूरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?

खरं तर, यूरिक अ‍ॅसिड हा शरीरात असलेला एक टाकाऊ पदार्थ आहे. पचनानंतर यूरिक अ‍ॅसिड तयार होते. जेव्हा तुम्ही प्युरिनयुक्त पदार्थ खाता तेव्हा तुमचे मूत्रपिंड ते योग्यरित्या फिल्टर करु शकत नाहीत. अशा परिस्थितीत शरीरातून यूरिक अ‍ॅसिड बाहेर काढता येत नाही. शरीरात त्याचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते.

Uric Acid: प्रोटीन्स वाढवतात यूरिक अ‍ॅसिड? जाणून घ्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात
Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका

कोणत्या गोष्टी खाव्यात?

तज्ज्ञांच्या मते, शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर ठरते. तुमच्या आहारात संत्री, अननस आणि लिंबू यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ समाविष्ट करावेत. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com