Lip Care Tips : प्रत्येक मुलीला लिपस्टिक (Lipstick) लावायला खूप आवडते. प्रत्येक मुलीकडे पांच ते दहा प्रकारचे लिपस्टिक असतात. फिकट रंगाची (Light Colour) लिपस्टिक चेहऱ्याची रंगत वाढवते. स्त्रियांकडे ड्रेस किंवा साडीवर मॅचिंग लिपस्टिक असतात. लिपस्टिक (Lipstick) मध्ये एकाच रंगाच्या अनेक शेडस (Shades) असतात. कोणतेही मेकअप (Makeup) साधने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. परंतु लिपस्टिक ही सर्वात हानिकारक असते. लिपस्टिक लावल्यानंतर आपण खाऊ-पिऊ शकतो. त्यात असलेले केमिकल थेट तोंडातून पचनसंस्थेवर पोहोचते. जाणून घेऊया लिपस्टिक आपल्या आरोग्यासाठी (Health)किती हानिकारक आहे.
लिपस्टिक खरेदी करतांना या गोष्टी लक्षात ठेवा
लिपस्टिकमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. यामुळे आरोगयास हानीकारक ठरू शकतात. यात मॅंगनीज, कॅडमियम, अॅल्युमिनियम हे घटक एकत्रितरीत्या असतात. खर सांगायचे तर खाताना लिपस्टिकमधील केमिकल्स पोटात जातात. म्हणूनच, लिपस्टिक विकत घेतांना या घटकांची आठवण ठेवा आणि हे घटक असणारे उत्पादन खरेदी करू नका .
लिपस्टिकमध्ये जास्त प्रमाणात शिसे असतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होऊ शकतात. यात अनेक प्रकारचे प्रिजर्वेटिव्स असतात जे शरीरसाठी हानिकारक असतात. लिपस्टिकमध्ये पैरबीन नावाचे एक रक्षक असतात, ज्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय, बिस्मथ ऑक्सीक्लोराइझ नावाचा एक रक्षक आहे, ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. यामुळे अनेक लोकांमध्ये एलर्जी देखील होते. तसेच जर तुम्ही गर्भवती असाल तर लिपस्टिक लावणे टाळावे. स्वस्त लिपस्टिक खरेदी करणे टाळावे. तुम्ही हर्बल लिपस्टिक वापरू शकता.
लिपस्टिक खरेदी करतांना घ्या ही खबरदारी
- लिपस्टिक लावण्यापूर्वी पेट्रोलियम जेली किंवा लिप बाम लावावा. यामुळे दुष्परिणाम कमी होतात.
- लिपस्टिक खरेदी करतांना , हानिकारक उत्पादनाविषयी माहिती करून घ्यावी.
- नेहमीच चांगले ब्रँड लिपस्टिक खरेदी करा, जेणेकरून तुमच्या आरोग्यास कमी हानी पोहोचू शकेल.
- नेहमी डार्क रंगाची लिपस्टिक खरेदी करणे टाळा. कारण अशा लिपस्टिकमध्ये जड धातूंचे प्रमाण अधिक असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.