Buttermilk Health Benefits: हवामानात आर्द्रता वाढल्यानंतर ताक पित असाल तर 'हे' वाचाच

Buttermilk Health Benefits: हाडांबरोबच तुमचे दातदेखील मजबूत होतात.
Buttermilk
ButtermilkDainik Gomantak

Buttermilk Health Benefits: हवामानात आर्द्रता वाढल्यानंतर अनेक आजार बळावू शकतात. हवामानात आर्द्रता निर्माण झाल्यानंतर ताकाचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

ताज्या दह्यापासून बनवलेले ताक सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते. यामुळे पोट जड होणे, भूक न लागणे, अपचन आणि छातीत जळजळ या तक्रारी दूर होतात. अपचन झाल्यास ताकामध्ये भाजलेले जिरे, काळी मिरी पावडर आणि खडे मीठ मिसळून प्यायल्याने अन्नपचन होण्यास मदत होते.

ताक पिण्याचे 'हे' आहेत फायदे

1. नैसर्गिक थंडावा मिळतो

ताक हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी ताक अत्यंत उपयुक्त मानले जाते. यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो.

2. रोगप्रतिकारशक्ती वाढते

ताकाचे जर तुम्ही नियमित सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. विविध आजारांपासून लढण्याची शक्ती तुमच्या शरीरात तयार होते.

3. शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही

ताक खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. या ऋतूत जास्त घाम येतो. अशा स्थितीत डिहायड्रेशनची तक्रार असू शकते. त्यामुळे विशेषतः आर्द्रतेमध्ये ताक सेवन करण्याचा डॉक्टर सल्लादेखील देतात.

4. हाडे आणि दात मजबूत होतील

ताकामध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजाराला दूर ठेऊ शकता. हाडांबरोबच तुमचे दातदेखील मजबूत होतात.

5. पचनक्रिया

ताक प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यात प्रोबायोटिक्स आढळतात, जे शरीरात आतड्याच्या वाढीस प्रोत्साहन देतात. अशा प्रकारे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते.

6. अॅसिडिटीपासून आराम मिळतो

ताक खाल्ल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो. जेवल्यानंतर काही वेळाने ताक घेऊ शकता. यामुळे पोटात जळजळ होण्यापासून आराम मिळेल.

7. वजन कमी करण्यात उपयुक्त

ताक नियमित सेवन केल्याने तुम्ही तुमचे वाढते वजन कमी करू शकता. ताकामध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण कमी असते. एक प्रकारे, ते चरबी बर्नर म्हणून देखील कार्य करते. त्यामुळे जे लोक वाढत्या वजनाच्या समस्येने ग्रस्त आहेत ते ताकाचे सेवन करु शकतात.

ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?

मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरात सूज येऊ शकते. अशावेळी ताक सेवन केले तर मसाल्यांचा प्रभाव कमी होतो. जेवणानंतर पोट जड वाटत असेल तर ताक पिले तर शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात.

Buttermilk
Secret of Happy Marriage: नवऱ्याने बायकोला चुकूनही सांगू नयेत 'या' 4 गोष्टी

ताकात कोणते पोषकघटक मिळतात?

ताकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर पोषक तत्वे मिळतात. ताक आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थांची पातळी संतुलित करते. त्यामुळे ताक पिल्यानंतर डिहायड्रेट वाटत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com