Pregnancy Diet: गरोदर महिलांसाठी आवळा ज्युसचे फायदे

गरोदरपणात महिलांनी आहाराची खास काळजी घेणे गरजेचे असते.
Pregnancy Diet
Pregnancy DietDainik Gomantak
Published on
Updated on

Pregnancy Diet: गरोदरपणात महिलांनी आहाराबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण काय खावे आणि काय खाऊ नये या सर्व गोष्टींचा परिणाम आई आणि बाळाच्या आरोग्यावर होतो. आवळ्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी लाभदायी असतो. परंतु गर्भवती महिला आवळ्याचा रस घेऊ शकतात का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज आम्ही याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत.

गरोदर महिला आवळ्याचा ज्यूस घेऊ शकतात. पण ज्यूस सरकारी मान्यताप्राप्त ब्रँडचा असावा आणि ज्यूस व्यवस्थित पॅक करून स्टोअर केलेला असावा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात पोटॅशियम आणि आहारातील फायबरसारखे पोषक घटक देखील असतात. आवळा किंवा त्याचा ज्युस प्यायल्याने अनेक महिलांना गरोदरपणात मळमळ होण्यापासून आराम मिळतो.

Pregnancy Diet
Password Security: कीबोर्डवर केलेल्या क्लिक्सचा आवाज ऐकूनही चोरला जाऊ शकतो तुमचा पासवर्ड! अशी घ्या काळजी
Amla juice
Amla juiceDainik Gomantak
  • आवळा आरोग्यासाठी फायदेशीर

NCBI च्या एका संशोधनानुसार आवळा खाल्ल्याने अनेक प्रकारचे रक्तवहिन्यासंबंधी आजार दूर ठेवता येतात. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात. जे शरीर तसेच मेंदूला निरोगी ठेवण्याचे काम करतात. हे एचडीएल कोलेस्ट्रॉल सुधारण्यास आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

  • आवळा खाण्याची योग्य पद्धत

गरदोर महिलांनी फ्रेश आवळा खावा. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात आवळा खाणे आरोग्यदायी मानले जाते. आवळ्याचा जाम, लोणचे, बर्फी,ज्युस किंवा पावडर तयार करून तुम्ही सेवन करू शकता. तसेच गरोदर महिलांनी पॅकिंग केलेले बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.

  • घरीच बनवा आवळा ज्युस

जर तुम्हाला आवळ्याचा ज्युस प्यायची इच्छा असेल तर तो घरीच तयार करून फ्रेश पिणे चांगले असते. पॅकबंद ज्यूसमध्ये सहसा प्रिझर्व्हेटिव्ह, आर्टिशिअल फ्लेवर्स आणि साखर जास्त प्रमाणात असते. जर तुम्हाला व्हिटॅमिन सी वाढीसाठी आवळा मिळत नसेल, तर तुम्ही त्याऐवजी संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, टोमॅटो, किवी आणि पालक इत्यादींचा ज्युस घेऊ शकता.

  • पॅकिंग केलेला आवळा ज्युस खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी

आवळा ज्युस खरेदी करताना ज्यूसचे पॅकेट पुर्णपणे सीलबंद केलेले असावे

पॅकिंग केलेला आवळा ज्युसची एक्सपायरी डेट देखील तपासावी.

जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्ही फूड लेबलवर त्यात असलेल्या साखरेचे प्रमाण तपासावे.

ज्युस पिण्यापूर्वी त्यात थोडे पाणी घाला. यामुळे रसातील साखर आणि प्रिजर्वेटिव्सचे प्रमाण कमी होईल. अर्धा ग्लास ज्युस अर्धा ग्लास पाण्यात मिक्स करून प्यावे. जर ज्युसचा वास चांगला येत नसेल तर लगेच फेकून द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com