Bra Wearing at Night: रात्री ब्रा घालून झोपावे की नाही? तज्ञ याबाबत काय सांगतात एकदा वाचाच

काही स्त्रिया असे मानतात की रात्री ब्रा घालून झोपल्याने त्रास होतो, म्हणून त्या झोपताना ब्रा काढून झोपतात.
Bra Wearing at Night
Bra Wearing at NightDainik Gomantak
Published on
Updated on

स्वतःला अधिकाधिक सुंदर आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी महिला किंवा मुलींना विविध प्रकारचे स्टायलिश कपडे घालणे आवडते. पण जेव्हा अंडरगारमेंट्स, विशेषत: ब्राच्या निवडीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्यात खूप गोंधळ होतो. हे खरे आहे की आजही भारतातील बहुतेक महिलांना माहित नाही की त्यांच्या ब्राचा योग्य आकार काय असावा? शरीरानुसार कोणत्या प्रकारची ब्रा घातली पाहिजे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रात्री ब्रा घालून झोपायचे की नाही? ही सर्व उत्तरे इथे जाणून घ्या.

Bra Wearing at Night
Tulsi Leaves Benefits: तुळशीच्या पानांचा थेट आरोग्याशी संबंध; 'या' आजारांपासून होते सुटका

काही स्त्रिया असे मानतात की रात्री ब्रा घालून झोपल्याने त्रास होतो, म्हणून त्या झोपताना ब्रा काढून झोपतात. दुसरीकडे, काही स्त्रियांचा असा विश्वास आहे की ब्रा घालून झोपणे पूर्णपणे सामान्य आहे. आता प्रश्न पडतो की ब्रा घालून झोपल्याने शरीराला काही हानी होते का? यावर तज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

रात्री ब्रा घालून झोपल्याने शरीराचे काय नुकसान होते?

तज्ञांच्या मते, रात्री ब्रा घालून झोपायला हरकत नाही. ब्रा मुळे तुमच्या शरीराला कोणतीही हानी होते असे आतापर्यंतच्या कोणत्याही संशोधनातून समोर आलेले नाही. किंवा ब्रा घातल्याने किंवा न घातल्याने स्तनाचा कर्करोग किंवा इतर आजार होऊ शकतात की नाही, याबाबत असा कोणताही खुलासा झालेला नाही.

ब्रा घालणे महत्वाचे का आहे?

ब्रा घालणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे तुमचे शरीराचा आकार आटोक्यात राहतो. चांगली फिटिंग असलेली ब्रा घातल्याने तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलते. तसेच, कोणताही ड्रेस तुमच्यावर छान दिसतो.

तुम्ही कोणत्या प्रकारची ब्रा घालावी?

जेव्हा तुम्ही ब्रा खरेदी करायला जाल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, ब्रा आरामदायक असावी. ती तुम्हाला योग्य प्रकारे फिट बसते याची खात्री करून घ्या. ब्रा खूप घट्ट किंवा खूप सैल नसावी. योग्य आकाराचीच असावी. काही महिला रात्री सैल ब्रा घालून झोपतात पण असे करणे योग्य नाही. यामुळे स्तनाला योग्य आधार मिळत नाही. जर तुम्हाला पॅडेड किंवा अंडरवायर ब्रा आरामदायक वाटत असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता.

रात्री झोपताना ब्रा घालून झोपणे किंवा न घालून झोपणे हे सर्वस्वी प्रत्येकावर अवलंबून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com