Body Smell: सतत येणारी दुर्गंधी फक्त घामामुळे नाही! 'या' 3 गंभीर आजारांचे असू शकते संकेत, वेळीच सावध व्हा!

Persistent Body Smell: शरीराला येणारा वास (Body Odour) ही एक सामान्य बाब असली तरी, कधीकधी ती लाजिरवाणी ठरु शकते.
Persistent Body Smell
Body SmellDainik Gomantak
Published on
Updated on

Persistent Body Smell: शरीराला येणारा वास (Body Odour) ही एक सामान्य बाब असली तरी, कधीकधी ती लाजिरवाणी ठरु शकते. सामान्यतः, जेव्हा घाम त्वचेवरील बॅक्टेरियांच्या संपर्कात येतो, तेव्हा ही दुर्गंधी येते. पण केवळ घाम हेच याचे एकमेव कारण नसते. अनेकदा लोक शरीराला येणाऱ्या या दुर्गंधीकडे केवळ घामाचा वास समजून दुर्लक्ष करतात.

मात्र, जेव्हा हा वास दररोज येतो, अंघोळ करुनही जात नाही किंवा डिओड्रंट (Deodorant) लावूनही तो टिकून राहतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते. कारण शरीरातून येणारा विचित्र किंवा तीव्र वास अनेकदा एखाद्या गंभीर आजाराचे (Serious Disease) संकेत असू शकतो.

Persistent Body Smell
Heart Attack: तुमच्याही पायांवर दिसतायत ही लक्षणं? वेळीच व्हा सावध; नाहीतर कधीही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका!

जर त्वचेवर पुरळ, खाज सुटणे किंवा लालसरपणा यासोबतच असामान्य वास येऊ लागला किंवा कोणतेही कारण नसताना खूप जास्त घाम येऊ लागला तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. उष्णता किंवा जास्त शारीरिक श्रमानंतर घाम येणे सामान्य आहे, परंतु जेव्हा शरीरातून सतत वेगळ्या प्रकारचा वास येऊ लागतो, जसे की अमोनियासारखा, गोडसर किंवा माशांसारखा, तेव्हा तो शरीरातील एखाद्या समस्येची चेतावणी असू शकतो.

चला तर मग अशा तीन आजारांबद्दल जाणून घेऊया, ज्यात शरीराचा वास बदलतो आणि ज्यांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मधुमेह आणि शरीरातून येणारा गोडसर वास

मधुमेही रुग्णांमध्ये जर साखरेची पातळी (Sugar Level) खूप वाढली आणि इन्सुलिनची (Insulin) कमतरता निर्माण झालीतर शरीरात केटोएसिडोसिस (Diabetic Ketoacidosis – DKA) नावाची स्थिती निर्माण होते. या स्थितीत शरीरातून गोडसर किंवा फळांसारखा वास येतो. ही एक धोकादायक स्थिती असू शकते, जी योग्य उपचारांशिवाय कोमा किंवा मृत्यूलाही कारणीभूत ठरु शकते. जर एखाद्या मधुमेहग्रस्त (Diabetes) व्यक्तीच्या शरीरातून असा वास येऊ लागला, तर त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. श्वासातून येणारी दुर्गंधी देखील याच स्थितीचा भाग असू शकते.

Persistent Body Smell
Heart Attack: पुरुषांपेक्षा वेगळी का असतात महिलांची हृदयविकाराची लक्षणं? जाणून घ्या डॉक्टरांचं मत अन् प्रतिबंधात्मक उपाय

यकृत किंवा किडनीचे आजार आणि तीव्र वास

किडनी आणि यकृताचे काम शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढणे हे असते. जर या अवयवांमध्ये काही बिघाड झाला, तर हे विषारी घटक शरीरात जमा होऊ लागतात. किडनी निकामी झालेल्या रुग्णांच्या शरीरातून युरिया किंवा लघवीसारखा वास येऊ शकतो. यकृत खराब झालेल्या रुग्णांमध्ये (Patients) अनेकदा कच्चे मांस किंवा माशांसारखा वास येऊ लागतो, ज्याला "फेटोर हेपॅटिकस" (Fetor Hepaticus) असे म्हणतात. ही खूप गंभीर चिन्हे आहेत आणि त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीची गरज असते.

Persistent Body Smell
Heart Attack: महिलांनो ह्रदयविकाराचा धोका टाळायचाय का? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

थायरॉईडची समस्या आणि घामाची दुर्गंधी

थायरॉईड हार्मोन आपल्या शरीरातील चयापचय (Metabolism) नियंत्रित करतो. जेव्हा या हार्मोन्सचे संतुलन बिघडते (हायपरथायरॉईडिज्म किंवा हायपोथायरॉईडिज्म), तेव्हा शरीरात खूप जास्त घाम येऊ शकतो किंवा त्वचा कोरडी होऊ शकते. हायपरथायरॉईडिज्ममध्ये शरीर जास्त गरम होते आणि त्याला खूप घाम येतो, ज्यामुळे दुर्गंधी वाढू शकते. याउलट, हायपोथायरॉईडिज्ममध्ये त्वचा कोरडी झाल्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो, जो दुर्गंधीचे कारण बनतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com