Black Carrot Benefits : तुम्ही काळं गाजर खाल्लय का? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात मिळणारे काळे गाजर इतर गाजरांपेक्षा जास्त फायदे देते.
Black Carrot Benefits
Black Carrot BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

हिवाळ्यात, गाजर भाज्या बनवण्यासाठी आणि सॅलड म्हणून वापरतात. आहारात गाजराचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी वाढवते.

हिवाळ्यात गाजर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, व्हिटॅमिन-बी, फायबर आणि पोटॅशियमसह अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. विशेषत: हिवाळ्यात मिळणारे काळे गाजर इतर गाजरांपेक्षा जास्त फायदे देते. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी काळे गाजर रामबाण औषधापेक्षा कमी नाही. (Black Carrot Benefits)

Black Carrot Benefits
Winter Care Tips : हिवाळ्यात कोरड्या ओठांची अशी घ्या काळजी; लक्षात ठेवा या गोष्टी
  • काळ्या गाजरचे फायदे

1. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात काळे गाजर शरीरासाठी खूप फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करते. यासोबतच पोटदुखी आणि गॅसची समस्याही दूर करते. हे तुमच्या शरीरातील चयापचय वाढवून शरीरातील चरबी देखील कमी करते.

2. काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन मोठ्या प्रमाणात आढळते. हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. काळे गाजर रक्तातील अशुद्धता स्वच्छ करून रक्ताभिसरण सुधारते. गाजराचा रस शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवते.

 Black Carrot Benefits
Black Carrot BenefitsDainik Gomantak

3. मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी काळे गाजर रामबाण औषधाचे काम करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

4. डॉक्टरही याचे सेवन करण्याचा आग्रह करतात. याच्या सेवनाने दृष्टी वाढते. चष्म्यापासून सुटका हवी असेल तर आजपासून गाजर खाण्यास सुरुवात करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com