Diabetes Care: सावधान! ही लक्षणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते, तुम्ही देखील या समस्यांनी त्रस्त आहात ?

एक वेळ अशी येते जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिन स्वीकारणे बंद करतात, ज्यामुळे “इन्सुलिन रेझीस्टन्स”ची स्थिती निर्माण होते ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. याच स्थितीला मधुमेह असे म्हणतात.
Diabetes Care
Diabetes CareDainik Gomantak

Diabetes Care Tips: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवाण्यासाठी 'शतावरी' आहे फायदेशीरमधुमेह हा असा आजार आहे, ज्यावर अद्याप ठोस औषधोपचार तयार झाले नाहीत. त्यामुळेच सर्वचजण कटाक्षाने हा रोग होणार नाही याची काळजी घेत असतात. त्यासाठी नियमित व्यायाम कारणे, जंक फूड न खाणे, भाज्यांचा, फळांचा रस घेणे, अशी काळजी बरेचजण घेत असतात. मधुमेह झाला तर अनेक निर्बंध आपल्यावर येतातच आणि इतकी बंधने असलेलं जीवन अतिशय कंटाळवाण सुद्धा वाटू लागतं.

मधुमेहामुळे आपण फार कमजोर होतो, रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते व पटकन कोणते ही आजार आपल्याला होऊ शकतात, छोटी जखम जरी झाली तरी रक्तातील अत्याधिक साखरेच्या प्रमाणामुळे ती लवकर भरून येत नाही व चिघळते. मधुमेह का होतो व मधुमेह होणार आहे हे वेळीच ओळखून वेळीच यावर उपचार घेतले, तर आपल्याला सुरक्षित राहता येऊ शकते. मधुमेह का होतो व शरीर आपल्याला याचे कोणते संकेत देतं असते हे आपण पाहू..

आपण जे अन्न ग्रहण करतो, ते पोटात पचवले जाते व त्यातील ग्लूकोज हे पुढे पाठवण्यासाठी रक्तात मिसळले जाते. शरीर हे ग्लूकोज इन्सुलिन नावाच्या हॉर्मोन्सच्या मदतीने एनर्जीमध्ये परिवर्तित करते व ही ऊर्जा आपण नित्य कामे करण्यासाठी वापरते. एक वेळ अशी येते जेव्हा शरीरातील पेशी हे इन्सुलिन स्वीकारणे बंद करतात, ज्यामुळे “इन्सुलिन रेझीस्टन्स”ची स्थिती निर्माण होते व पेशींना पाठवलेले ग्लूकोज सरळ रक्तात मिसळू लागते. ज्यामुळे रक्तातील ग्लूकोज, अर्थात साखर वाढते व याच स्थितीला मधुमेह असे म्हणतात.

  • 1) भूक शांत न होणे – जर प्री – डायबिटिजची स्थिती शरीरात निर्माण झालेली असेल किंवा तुम्ही मधुमेहाच्या अगदी उंबरठ्यावर आलेला असाल, तर किती ही खाल्लत तरी काही वेळाने पुन्हा भूक लागेल. जे अन्न तुम्हाला ५-६ तास ऊर्जा पुरवेल असे वाटते, तेच अन्न खाऊन देखील पुरेसे वाटत नाही. हा एक संकेत आहे, की तुमच्या शरीरातील साखर आवश्यकतेपेक्षा अधिक झालेली आहे.

  • 2) सतत थकवा येणे – वर नमूद केल्याप्रमाणे ‘इन्सुलिन रेझीस्टन्स’मुळे ग्लूकोज ऊर्जेत परिवर्तित होत नाही, ज्यामुळे शरीरात ऊर्जेचा अभाव होतो व सतत थकवा जाणवू लागतो.

  • 3) सारखी लघवी होणे – मधुमेहाच्या रुग्णाला बरेचदा मुत्रविसर्ग होतो, विशेषतः रात्रीच्या वेळी. शरीरातील ग्लूकोजच्या वाढलेल्या मात्रेमुळे किडनीचे शुद्धीकरणाचे काम वाढते ज्यामुळे जास्त लघवी लागते.

  • 4) तहान लागणे – मधुमेहाच्या रुग्णाला लघवीचा त्रास होत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण भरपूर कमी होते व सारखी तहान लागते, घशाला सतत कोरडच पडलेली असते.

Diabetes Care
Diabetes Care Tips: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवाण्यासाठी 'शतावरी' आहे फायदेशीर
  • 5) त्वचेला खाज येणे – शरीरात पाणी कमी असल्याने, इतर अवयवांना पाणी पुरवठ्यात कमतरता होते. ज्यामुळे त्वचा अत्यंत कोरडी होते व सतत खाज येऊ लागते.

  • 6) दृष्टी अंधुक होणे – आपल्या डोळ्यांत अगणित अत्यंत नाजूक रक्तवाहिन्या असतात. रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण वाढल्याने, डोळ्यातील या रक्तवाहिन्यांत रक्ताभिसरण नीट होत नाही व त्यांना ईजा होते. ज्यामुळे डोळ्यांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही व दृष्टी नाजूक होते. धुरकट व अस्पष्ट दिसू लागते.

Diabetes Care
Diabetes Care: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरा 'या' सोप्या आयुर्वेदिक उपचार पद्धती
  • 7 ) जखम लवकर बरी न होणे – ग्लूकोज वाढले, की रक्तातील घाव बरे करणारा घटक कमी होतो. त्यामुळे लहानात लहान जखम सुद्धा बरी होण्यास महिनाभर किंवा त्याहूनही अधिक वेळ घेते. जखम चघळून त्याचे रूपांतर गँग्रीन मध्ये सुद्धा होते.

  • 8 ) हात पाय बधीर होणे – शरीरात कित्येक अत्यंत लहान रक्तवाहिन्या असतात. वाढलेल्या ग्लूकोजमुळे त्यांना इजा होते व त्या अंगात रक्तस्त्राव नीट होत नाही. ज्यामुळे तिथे नीट रक्ताभिसरण होत नाही व ते अवयव वेळोवेळी बधीर होऊ लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com