Benefits of putting oil in navel: लहान मुलांची वाढ होण्यासाठी मसाज करणे फायदेशीर मानले जाते. तसेच नाभीत तेलाचे काही थेंब टाकणे देखील फायदेशीर मानले जाते.
आयुर्वेदामध्ये देखील नाभीला तेल लावण्याचे फायदे सांगितले आहेत. नाभि तेल थेरपी (Navel Oil Therapy) या नावाने इतर अनेक प्राचीन वैद्यकीय ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे.
नाभी हा आपल्या शरीराच्या शक्तीचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे नाभीमध्ये तेल लावल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.
आजकाल या जुन्या पद्धती विसरून लोक प्रत्येक समस्येवर रसायनांमध्ये उपाय शोधू लागले आहेत. पण हे नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरु शकतात. चला तर मग जाणून घेउया की कोणत्या समस्येमध्ये नाभीत तेल लावल्यास आराम मिळेल.
ओठ फाटणे (Crack Lips)
अनेकांना ओठ फाटण्याची समस्या असते. यासाठी आयुर्वेदानुसार झोपण्यापूर्वी नाभीत मोहरीचे तेल लावावे. हा उपाय केल्याने काही दिवसात फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल. काही दिवसांनी तुमचे ओठ गुळगुळीत आणि चमकदार दिसू लागतील.
निस्तेज आणि ड्राय त्वचा (Dull and Dry Skin)
ड्राय आणि निर्जीव त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदाम तेल वापरणे फायदेशीर मानले जाते. झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे दोन थेंब नाभीत टाकावे. यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते.
मुरुम आणि पुरळ ( Pimples and Acne)
मुरुम, पुरळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर नाभीमध्ये टाकण्यास करावा. कडुलिंबाच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि पुरळाची समस्या दूर करण्यास मदत करेल.
प्रजनन समस्या (Fertility problem)
प्रजनन क्षमतेची समस्या असलेल्या लोकांनी नाभीमध्ये खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेलामध्ये आढळणारे ट्रायग्लिसराइड्स प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करेल. झोपण्यापूर्वी नाभीत खोबरेल तेलाचे दोन ते चार थेंब टाकून हलक्या हातांनी मसाज करावी.
सर्दी-खोकला आणि मासिक पाळीतील समस्या (Cold and Cough)
सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर अल्कोहोलचे काही थेंब नाभीत टाकल्यास फायदा होईल. मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळवण्यासाठी ब्रँडीचा वापर केला जाऊ शकतो.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.