रोज दही खाणे फायदेशीर आहे की नाही ? जाणून घ्या एका क्लीकवर

सुंदर त्वचा, चमकदार आणि कोंडा मुक्त केसांसाठी घरगुती उपाय म्हणूनही दह्याचा वापर केला जातो.
Curd
CurdDainik Gomantak
Published on
Updated on

दही साधारणपणे सर्वांनाच आवडते. जेवणासोबत दही रायता बहुतेक लोकांच्या घरी रोज बनवला जातो. दह्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे त्याला सुपरफूड देखील म्हटले जाते. दह्यामध्ये भरपूर पोषक असतात. हे प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी-12, लिनोलिक ऍसिड आणि इतर प्रमुख फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे.

Curd
Fish Cooking Tips: मासे बनवतांना 'या' टिप्स ठेवा लक्षात

दही सर्वच ऋतूंमध्ये मिळत असले, तरी जेव्हा वातावरण उष्ण असते तेव्हा घरोघरी फक्त रायता बनवला जात नाही, तर सकाळ-संध्याकाळ लस्सीचा कार्यक्रमही होतो. सुंदर त्वचा, चमकदार आणि कोंडा मुक्त केसांसाठी घरगुती उपाय म्हणूनही याचा वापर केला जातो.

आपण अनेकदा आपल्या इच्छेनुसार इतर कोणत्याही खाद्यपदार्थात दही मिसळून खातो. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदात दही खाण्याचे काही आरोग्यदायी मार्ग आणि वेळा सांगितल्या आहेत. आयुर्वेद डॉक्टर याविषयी काय म्हणतात ते जाणून घेऊया-

दह्यासोबत चिकन खाणे टाळावे
तुम्ही जर मांसाहाराचे शौकीन असाल तर तुम्ही ही चूक नक्कीच करत आहात. चिकन असो की मटन, त्यासोबतची रायत्याची चव तुमचे आरोग्य बिघडू शकते. जर तुम्ही ही चूक करत राहिल, तर तुमच्या शरीरात कधीही सोरायसिस, संधिवात आणि फोडासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Curd
तुम्हाला पण उभं राहून पाणी प्यायची सवय आहे? मग जाणून घ्या हे तोटे

दही आणि फळ स्मूदी
YouTube वर वेगवेगळ्या रेसिपीज बघून लोक दही आणि फ्रूट स्मूदी बनवतात. मात्र हे एकत्र खाणे शरीरा साठी हानिकारक आहे.

रोज दही खाणे फायदेशीर आहे की नाही?
आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दह्यामध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे असली तरी त्याचे रोज सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. ज्या लोकांना लॅक्टोजची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी रोज दह्याचे सेवन करणे त्रासदायक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com