Fish Cooking Tips: मासे बनवतांना 'या' टिप्स ठेवा लक्षात

Rain Cooking Tips: पावसाळ्यात मासे बनवतांना विषेश काळजी घ्यावी.
Fish Cooking Tips
Fish Cooking TipsDainik Gomantak

जर तुम्हाला मासे (Fish) खायला आवडत असेल तर तुम्ही ते शिजवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मासे बनवताना छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमची प्रत्येक डिश खूप चविष्ट होईल. साफसफाईपासून, लहान काटे काढण्यापर्यंत, मॅरीनेशनपर्यंत, फ्लिप करण्यापर्यंत, तुम्हाला काही मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. (Fish Cooking Tips News)

* मासे खरेदी करताना माशांचा वास येत असेल, खूप दिवसांपासून मृत झालेले मासे खरेदी करणे टाळा. यामुळे आजार होऊ शकतात.


* मासे साफ करण्यासाठी हाताची काळजी घ्यावी.


* मासे लवकर खराब होतात, म्हणून मासे धुऊन बर्फाच्या भांड्यावर ठेवा. यामुळे मासे अधिक वेळ ताजे राहतात.

Fish Cooking Tips
तुम्हाला पण उभं राहून पाणी प्यायची सवय आहे? मग जाणून घ्या हे तोटे

* माशाचे मांस नरम असते आणि त्यावर लिंबू जास्त वेळ लावुन ठेवल्यास ते सहजपणे खराब होऊ शकते. तज्ञांच्या मते, स्वॉर्डफिश सारख्या स्ट्रीकी माशांना जास्तीत जास्त 2 तास मॅरीनेट केले जाऊ शकते आणि ट्राउट सारख्या फ्लॅकी माशांना 30 मिनिटांपेक्षा जास्त मॅरीनेट केले जाऊ नये.

* तव्यावर मासे भाजताना टिश्यू पेपरचा वापर करावा. जर तुम्ही मॅरीनेट केलेले मासे शिजवत असाल तर मंद आचेवर तळून घ्या म्हणजे मसाले जळणार नाहीत.

* एकदा मासा कढईत ठेवला की तो मऊ होतो आणि पलटण्यासाठी नियमित स्पॅटुला वापरल्याने मासे तडे जाऊ शकतात. म्हणून, नेहमी पातळ फिश स्पॅटुला वापरा, जे विशिष्ट मासे शिजवण्यासाठी वापरले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com