Chardham Yatra: विक्रमी चारधाम यात्रा! 46 लाख भाविक दाखल, 100 कोटींची कमाई

Chardham Yatra
Chardham YatraDainik Gomantak

चारधाम यात्रेला (Chardham Yatra) भारतात खूप महत्व आहे. हिंदू मान्यतेनुसार, आयुष्यात एकदा तरी चारधामला भेट देणे पवित्र मानले जाते. कोरोनानंतर सुरू झालेल्या चारधाम यात्रेने यंदा यात्रेकरूंच्या उपस्थितीचा विक्रम मोडला आहे. केदारनाथ धामला (Kedarnath Yatra) जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या अधिक असते. प्रवाशांची ये-जा करणाऱ्यासाठी घोडा आणि खेचरांचा वापर केला जातो, यातून व्यवसायिकांनी 100 कोटींहून अधिक रूपयांचा व्यवसाय केला आहे.

Chardham Yatra
Medical Education In Marathi: महाराष्ट्रात आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून

हिवाळ्यामुळे केदारनाथ धाम आणि यमुनोत्री मंदीरे बंद करण्यात आली आहेत. यंदाची चारधाम यात्रा खूप चांगली झाली. योग्य व्यवस्थापनामुळे यावेळी 46 लाखांहून अधिक भाविक चारधामच्या दर्शनासाठी आले आहेत, ही विक्रमी संख्या आहे. अशी माहिती गढवाल मंडल विकास निगमचे व्यवस्थापकीय संचालक माहिती महासंचालक बंशीधर तिवारी यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.

Chardham Yatra
Worlds Tallest Shiva: जगातील सर्वात उंच शिवमूर्ती तयार; दहा वर्ष सुरू होते काम

बंशीधर तिवारी म्हणाले, यंदा यात्रेतून मिळणाऱ्या उत्पन्नाने देखील अनेक विक्रम मोडले आहेत. यावेळी केदारनाथ धाम आणि यमुनोत्री यात्रेतील यात्रेकरूंना हेली कंपन्या, दांडी-कांडी आणि घोडे-खेचर प्रवास भाड्यातून सुमारे 211 कोटींची कमाई झाली आहे. केदारनाथ धाममध्ये ऑगस्टपर्यंत 40 कोटींचे उत्पन्न होते, यावेळी नोव्हेंबरच्या सुरुवातीपूर्वी 50 कोटींवर पोहोचले आहे.

Chardham Yatra
Rajpal Yadav मूर्ती लहान असली तरी किर्ती महान आहे

सप्टेंबर महिन्यात यात्रेकरूंची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. मे 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चारधाम दर्शनाला पोहोचलेल्या यात्रेकरूंच्या संख्येने तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे. ताज्या आकडेवारीनुसार चारधाम यात्रा यात्रेकरूंच्या संख्येने दशकातील विक्रम मोडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com