Beetroot Soup: हिवाळ्यात बीटचा सुप ठरतो इम्युनिटी बूस्टर

Healthy Tips: बीटरूट सूप पिणे अनेक आजारांना दुर ठेवतो.
Beetroot Soup
Beetroot SoupDainik Gomantak
Published on
Updated on

हिवाळ्यात अनेक सुपचे सेवन केले जाते. पण यामध्ये बीटचे सुप पिणे आरोग्यदायी असते. बीटमध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, फॉस्फरस, मॅंगनीज, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्व असतात. बीटरूटपासून पुडिंग, ज्यूस, सॅलड आणि सूप असे अनेक पदार्थ बनवले जातात.

प्रतिकारशक्ती वाढते

बीटमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्याचे काम करते. गरम बीटरूट सूप प्यायल्यास सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका दूर राहतो.

त्वचा निरोगी राहते

बीटरूट त्वचेसाठी (Skin) खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट त्वचेच्या पेशी सुधारण्याचे काम करतात. बीट सूप किंवा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचेच्या समस्या दूर होतात.

शरीरातील रक्त वाढते

बीटमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते. बीट सूप प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो. तसेच वजन वाढण्यास मदत होते. अॅनिमियासारख्या आजारात बीटचे सूप फायदेशीर आहे.

Beetroot Soup
Agra Petha: 'हा' पदार्थ आग्राच्या पेठ्याची आहे खासियत, एकदा नक्की ट्राय करा

हाडांचे आरोग्य निरोगी राहते

बीट हाडे मजबूत करण्याचे काम करते. यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. जे हाडे आणि स्नायू मजबूत करण्याचे काम करतात. सांधेदुखीच्या समस्येतही आराम मिळतो.

हृदय निरोगी राहते

बीटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रक्त प्रवाह सुधारण्याचे काम करतात. त्याचे सूप बनवून प्यायल्याने हृदयाशी (Heart) संबंधित आजारांचा धोका दूर होतो. बीट सूप कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com