Sleep Problem: निरोगी आरोग्यासाठी पोषक आहारासह पुरेशी झोप देखील गरजेची असते. पुरेशी झोप घेतल्याने आपली पचनसंस्था योग्यरित्या कार्य करते. प्रत्येक व्यक्तीने किमान 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे असे तज्ञांचे मत आहे.
अनेक लोक असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. जेणेकरून आपल्याला चांगली झोप लागेल.या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
1. चहा/कॉफीचे सेवन टाळा
रात्री झोपण्यापुर्वी चहा आणि कॉफी पिण्याची सवय असेल तर बंद करा. कारण हे शरीरातील कॅफिनची पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. कॅफीन तुमच्या मज्जातंतूंना उत्तेजित करते. याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो.यामुळे रात्री झोप येत नाही.
2. मद्यपान टाळा
मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक असते. मद्यपान केल्याने झोपेवर विपरित परिणाम होतो. यामुळे दुसऱ्या दिवशी कामवर लक्ष केद्रित करु शकत नाही. चांगली झोप हवी असेल तर मद्यपान करणे टाळावे.
3. जेवणाची योग्य वेळ
रात्रीचे जेवण लवकर करणे चांगले असते. कारण जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवता तेव्हा तुम्हाला छातीत जळजळ होते आणि लवकर झोप येत नाही. रात्री आपली पचनसंस्था देखील मंदावते. यामुळे रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी करावे.
4. रात्री हलके जेवण करावे
रात्री जड जेवण केल्याने अन्न पचण्यास खूप त्रास होतो. यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे रात्री मुगाची खिचडी किंवा भाकरी खाण्यास प्राधान्य द्यावे.
5. पोषक तत्व
रात्रीच्या जेवणात पोषक घटकांचा समावेश करावा. फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादींचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने मध्यरात्री भुक लागणार नाही आणि तुम्हाला शांत झोप लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.