Bathing Tips : अंघोळ करताना या चुका टाळा; नाहीतर केस गळतीला होईल सुरुवात

केसांचे सार ठेवण्यासाठी जेव्हा आपल्याला वारंवार आंघोळ करण्याची गरज भासते
Bathing Mistakes
Bathing MistakesDainik Gomantak
Published on
Updated on

केसांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी जेव्हा आपल्याला वारंवार अंघोळ करण्याची गरज भासते, परंतु घाईघाईत अंघोळ करण्याच्या नादात आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. अंघोळ करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

Bathing Mistakes
Cold Wave : वातावरणात होतोय बदल! श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला...
  • अंघोळीच्या या चुका केसांना इजा करतात

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अंघोळ केली तर केसांचा संरक्षणात्मक थर खराब होऊ शकतो आणि त्यामुळे कोरडेपणा देखील येऊ शकतो आणि हळूहळू केस गळणे सुरू होईल आणि टक्कल पडेल. चला जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण अंघोळ करताना करू नये.

1. कोमट पाण्याने डोके धुणे

ज्याप्रमाणे हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनरच्या उष्णतेने केस खराब होतात, त्याचप्रमाणे गरम पाण्याने डोके वारंवार धुतल्यास केस कमजोर होतात आणि केसगळतीला सामोरे जावे लागते.

2. कंडिशनर लावणे

केसांच्या मुलायमपणासाठी आपण अनेकदा कंडिशनर वापरतो, परंतु ते टाळूवर न वापरण्याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण यामुळे मुळे कमकुवत होऊ शकतात.

Hair Fall
Hair Fall Dainik Gomantak

3. चुकीच्या शॅम्पूची निवड

केस धुण्यासाठी योग्य शाम्पू निवडणे फार महत्वाचे आहे. जर तुमचे केस कोरडे असतील तर तेलकट केसांसाठी बनवलेला शॅम्पू अजिबात वापरू नका, यामुळे फायद्याऐवजी नुकसान होईल. शॅम्पू निवडण्यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा.

4. केस खूप घासणे

अनेक वेळा आपण शॅम्पूने केसांना जास्त घासतो, असे केल्याने केस खराब होतात, जे नंतर टक्कल पडण्याचे कारण बनतात. हलक्या हातांनी केसांना शॅम्पू लावा आणि मुळांपर्यंत पोहोचवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com